नाशिक

नाशिक कुंभ च्या पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवीन बांधकाम तंत्र उपयुक्त – महापौर

बिल्ड एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक – देशात विविध पायाभूत सुविधा उभारणीच्या कामात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या सभासदांची मोलाची भूमिका असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये होत असलेल्या विविध विकास कार्यात देखील कंत्राटदारांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय.) नाशिक सेंटर आणि एएए एन्टरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बिल्ड एक्स्पो २०२६” या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. या प्रदर्शनाचे आयोजन २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जुना गंगापूर नाका येथील श्रद्धा लॉन्स येथे करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, बी.ए.आय.चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील बी.ए.आय. नाशिक सेंटरचे अध्यक्ष मनोज खांडेकर ,मानद सचिव तसेच बिल्ड एक्स्पो चे निमंत्रक अविनाश बी. आव्हाड ,नगरसेवक सुरेश अण्णा पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता विजय कोटेच्या आणि सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरेंद्र कंकरेज आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच होत असून बांधकाम मशिनरी, अत्याधुनिक साहित्य, बांधकाम केमिकल्स, इको-फ्रेंडली व शाश्वत बांधकाम साहित्य तसेच विविध प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल्सची सविस्तर माहिती येथे उपलब्ध असून
बांधकाम आणि पायाभूत सुविधा या उद्योगाशी संबंधित उत्पादक, सेवा प्रदाते आणि त्यांचा वापर करणारे व्यावसायिक यांच्यासाठी खुले राहणार आहे.

या निमित्ताने पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद आणि व्यवहाराची संधी उपलब्ध होईल. विकसक, अभियंते, वास्तुविशारद, उत्पादक, पुरवठादार आणि तंत्रज्ञान प्रदाते यांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे.

प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी जनरल कौन्सिल मेंबर राजेंद्र मुथा , अभय चोकसी, मदन जगोटा,राजेंद्र गोठी,राहुल सूर्यवंशी , नाशिक सेंटरचे माजी अध्यक्ष विजय बाविस्कर, उपाध्यक्ष प्रशांत सोनजे, कोषाध्यक्ष विलास निफाडे, सहसचिव संदीप दरगोडे, महेंद्र पाटील , सुभाष भंडारी, राजेंद्र पानसरे तसेच सर्व सभासद विशेष परिश्रम घेत आहेत.

आज बिल्डर्स डे कार्यक्रम

आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी बिल्डर्स डे साजरा करण्यात येत असून या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट सिव्हिल अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या वर्षी जीवन गौरव पुरस्कार नवीनचंद्र चोकसी यांना तर उत्कृष्ट अभियंता पुरस्कार निलेश पाटील आणि विशाल मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. बिल्डर्स डे कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून के के वाघ महाविद्यालयाचे डीन डॉ.सुनील कुटे असून बी ए आय चे राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती राहील अशी माहिती समन्वयक राजेंद्र मुथा यांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *