भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील भारतातील इतिहासातील सर्वात मोठ्या मुक्त व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. या डीलला आता मदर ऑफ ऑल डील म्हटलं जातेय. युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष एंतोनियो लुईस सांतोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कराराची घोषणा झाली.
भारत आणि युरोपियन यूनियन यांच्यात 180 अब्ज युरोचा व्यापार आहे. 8 लाखांपेक्षा अधिक भारतीय युरोपियन यूनियन देशात राहत आहेत. स्ट्रॅटेजिक टेक्नेलॉजी, क्लीन एनर्जी, डिजिटल गव्हर्नन्स ते डेव्हलपमेंट पार्टनरशिपपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात सहयोगाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. यासह आजच्या कराराद्वारे समाजाच्या सर्व वर्गांना लाभ पोहोचवणारे निर्णय घेतले आहेत, असं मोदी म्हणाले.
भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. हा एक ऐतिहासिक करार आहे. यामुळं शेतकरी आणि छोट्या उद्योगांना युरोपियन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. उत्पादन क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. सेवा क्षेत्रात सहकार्य अधिक प्रबळ करेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
या करारामुळं भारत आणि युरोपियन युनियनमध्ये गुंतवणुकीला बुस्ट मिळेल. नव्या नाविन्यता भागीदाऱ्या बनतील. जागितक पातळीवर पुरवठा साखळीला मजबूत करेल. हा फक्त मुक्त व्यापार करार नसून भागिदारी समृद्धीची नवी ब्लू प्रिंट असेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्ही मोबिलिटीसाठी नवा फ्रेमवर्क तयार करत आहोत. यामुळं भारतीय विद्यार्थ्यांना युरोपियन युनियनमध्ये संधी मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य प्रत्येक कराराचा पाया असतो. आम्ही आज याला सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीतून औपचारिक रुप देत आहोत. यातून दहशतवादाविरोधातील लढा, सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यातील भागीदारी मजबूत होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
स्कॉट बेझंट अर्थमंत्री अमेरिका आम्ही भारतावर २५% कर लादला कारण तो रशियन तेल खरेदी करत होता. पण गेल्या आठवड्यात युरोपने भारतासोबत व्यापार करार केला. रशियन तेल भारतात जाते, तिथे शुद्ध केले जाते आणि नंतर युरोप ते खरेदी करतो. युरोपला आर्थिक फायदे मिळत आहेत.




