अकोट अकोला जिल्हा

अकोट विधानसभा युवक काँग्रेसची आढावा बैठक

आज अकोट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने यात्रा चौक येथील महेश भाऊ गणगणे जनसंपर्क कार्यालय येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा तसेच स्थानिक पातळीवरील विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः “लाडकी बहिणी” योजनेअंतर्गत अनेक पात्र महिलांना अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. काही महिलांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी, बँक खात्याची समस्या, कागदपत्रांची पडताळणी प्रलंबित राहणे अशा अडचणी समोर आल्या आहेत.

युवक काँग्रेसच्या वतीने या सर्व तक्रारींची यादी तयार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचेही ठरविण्यात आले. सदर बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभा पक्षनेता अॅड. महेश भाऊ गणगणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात आली. यावेळी अकोट विधानसभा अध्यक्ष निलेश आग्रे, युवक काँग्रेस अकोट तालुका अध्यक्ष रोशन चिंचोलकर एनएसयूआई चे अभय तेलगोटे, पंकज ठाकरे, केशव हेंड, शंतनू खवले ऋत्विक सोनटक्के, महेश तेलगोटे, संदेश घनबाहादुर ,पंकज आग्रे, अतुल तेलगोटे, रोहित तेलगोटे ,जय तेलगोटे, स्वप्निल तेलगोटे, यश तेलगोटे, लोकेश सपकाळ, पनू तेलगोटे ,वैभव तेलगोटे, रोहित तेलगोटे, आकाश तेलगोटे, निखिल तेलगोटे. यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या माध्यमातून युवक काँग्रेस संघटना अधिक सक्षम करण्याचा व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठविण्याचा निर्धार करण्यात आला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *