अजित पवारांचा काळ बनून आलेलं ते ‘धुके’ की घातपाताचे सावट? सीआयडी चौकशीच्या आदेशाने खळबळ !

बारामतीच्या धावपट्टीवर नेमकं काय शिजलं?
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘पर्व’ संपलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान अपघाताची सीआयडी (CID) चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. हा केवळ एक अपघात होता की यामागे काही भयानक कट रचला गेला होता? या प्रश्नाने आता संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
मृत्यूचा तो थरारक ‘काऊंटडाऊन’: शेवटच्या २५ मिनिटांत काय झालं?
सरकारी अहवालातील धक्कादायक माहितीनुसार, २८ जानेवारीच्या सकाळी ८:१८ ते ८:४३ या २५ मिनिटांच्या कालावधीत मृत्यूचा सापळा रचला गेला होता.
संपर्क तुटला: सकाळी ८:१८ ला विमानाचा एटीसीशी संवाद झाला, पण त्यानंतर काही वेळातच वैमानिकाचा आवाज शांत झाला.
दृश्यमानतेचा खेळ: धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं. ‘रनवे दिसत नाही’ हे वैमानिकाचे शेवटचे शब्द ठरले.
भीषण स्फोट: सकाळी ८:४३ वाजता विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी १०० फूट उंचीवरून थेट जमिनीवर आदळलं. विमानाचे तीन तुकडे झाले आणि आगीच्या गोळ्याने होत्याचं नव्हतं केलं.
सीआयडीच्या रडारवर ‘हे’ पाच संशयास्पद मुद्दे
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवताना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत:तांत्रिक बिघाड की हस्तक्षेप? ऐन लँडिंगच्या वेळीच विमानाचे नियंत्रण कसे सुटले?
सुरक्षेतील त्रुटी: बारामती विमानतळावर ‘आयएलएस’ (ILS) यंत्रणा नसतानाही तिथे लँडिंगचा धोका का पत्करला गेला?
विमानाची ‘कुंडली’ तपासणार: लँडिंगच्या काही तास आधी विमानात कोणी प्रवेश केला होता का?
घातपाताचा अँगल: अपघाताच्या वेळी विमानाने घेतलेला ‘मोठा वळसा’ (Aborted Landing) नैसर्गिक होता की भाग पाडलेला?
ब्लॅक बॉक्समधील गुपित: विमानाच्या ‘व्हॉइस रेकॉर्डर’मध्ये शेवटच्या क्षणी नेमका कोणाचा आवाज कैद झाला आहे?
पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून बारामती विमानतळ ‘सील’
घटनेनंतर बारामती पोलिसांनी तातडीने विमानतळ परिसरात तटबंदी उभारली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून विमानाचे अवशेष, इंधन आणि इतर रासायनिक नमुने गोळा केले आहेत. डीजीसीए (DGCA) आणि सीआयडी या दोन्ही यंत्रणा समांतर तपास करत असून, जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
—
Deepak Kaitke




