नवी मुंबई

“आमदार चषक 2026” क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्

नवी मुंबई :कै. गणपतशेठ तांडेल मैदानात सुरू असलेल्या “आमदार चषक 2026” क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवसही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. स्थानिक क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मैदानावर दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
दिवसभर झालेल्या सामन्यांमध्ये विविध संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भर उन्हात फलंदाजांनी आकर्षक फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला, तर गोलंदाजांनीही अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघांना रोखण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे अनेक रोमांचक क्षण निर्माण झाले आणि प्रेक्षकांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत खेळाडूंना जोरदार दाद दिली.
स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्तम पद्धतीने करण्यात आले असून आयोजकांनी खेळाडू व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळत आहे. पुढील दिवसांमध्ये होणाऱ्या सामन्यांबाबत खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तसेच गटात करावे ११ विरुद्ध सीवूड्स ११, स्पर्श ११ बेलापूर विरुद्ध जय बजरंगबळी दिवाळे, सानपाडा विरुद्ध श्री कृष्ण स्टार वाशी गाव तर कै कांता स्मृती करावे विरुद्ध ए.पी.बॉईज नेरुळ या संघांमध्ये सामने रंगले.

यावेळी आमदार. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत पोलीस पाटील दिलीप पाटील, पुण्यनाथ तांडेल, अश्विन पाटील, योगेश तांडेल, मिलिंद भोईर, विरचंद्र तांडेल, गुरुनाथ तांडेल, शिवम तांडेल, विरसेन तांडेल, मिलिंद कडू, तसेच तरुण खेळाडू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *