उल्हासनगर , दि . ५ प्रतिनिधी : देशात राज्यात आर पी आय ची युती असताना उल्हासनगर शहरात आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी शिवसेने सोबत जावुन पक्षाचा अधिकृत एक ही उमेदवार दिला नसुन शहरात बागुल यांनी आर पी आय ( आठवले ) संपवल्याचा आरोप पक्षाचे जिल्हा महासचिव पंडीत निकम यांनी पत्रकारासमक्ष केला आहे.
उल्हासनगर शहर हे आर पी आय ( आठवले ) चा बाले किल्ला असुन यापुर्व अनेक नगरसेवक निवडुन आले आहेत. तेव्हा सात वर्षानी महापालिकेची निवडणुक लागली आहे. राज्यात आर पी आय ची भाजपा सोबत युती आहे. प्रत्येक महापालिकेत आर पी आय भाजपा सोबत असताना उल्हासनगर मध्ये मात्र विपरित झाले आहे. आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी भाजपा सोबत युती न करता थेट शिवसेने ( शिंदे ) सोबत जाऊन स्वता धनुष्य बाण या चिन्हावर निवडणुक लढवत आहेत. तेव्हा काल आर पी आय व भाजपा यांची सयुक्त पत्रकार परिषद झाली असुन या परिषदेत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांनी आर पी आय बाबत स्पष्ट करताना सांगितले की आम्ही जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांना ११ जागा देण्याचे मान्य केले होते . परंतु ते चर्चेला आलेच नाही .
दरम्यान आर पी आय जिल्हा महासचिव पंडीत निकम यांनी आपली पक्षाची भुमिका मांडताना सांगितले की बागुल यांनी पक्षाचा एक ही अधिकृत उमेदवार दिला नाही . फक्त स्वतासाठी शिंदे सेने कडुन दोन जागा घेवुन शहरात पक्ष संपवला असल्याचा आरोप केला आहे.या पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी , जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया , आर पी आय कार्याध्यक्ष अंबादास गायकवाड , बापु सोनवणे , पंडीत निकम यांच्यासह पक्षाच्या महिला उपस्थित होत्या . या महिलामध्ये सुध्दा नाना बागुल बाबत रोष दिसुन येत होता. मात्र या बाबत आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी सुध्दा पत्रकार परिषद घेतली असुन या परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय सचिव व ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंगे यांनी सांगितले की आमची शिंदे सेने सोबत युती असल्याचे जाहीर केले असुन आमचे उमेदवार निवडणुक लढवत असल्याचे सांगितले आहे. तर ही युती रामदास आठवले यांच्या सांगण्यावर युती झाली आहे . पक्ष हा संपलेला नसल्याची प्रतिक्रिया बारसिंगे यांनी दिली आहे.



