उल्हासनगर महापालिकेतील दिव्यांग व सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवर प्रहार संघटना आक्रमक
उल्हासनगर , दि . २२ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या मनमानी कामाविरुध्द प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दिव्यांगाना अद्याप ही स्टॉल मिळाले नसुन मागील कित्येक वर्षांपासुन प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे दिव्यांगांना स्टॅाल मिळणेबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु दिव्यांगांना स्टॅाल उपलब्ध करून देण्याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही . दिव्यांग विभागाने दिव्यांगांना स्टॅाल देण्याकरिता काढलेली निविदा दिव्यांगांकरीता पूर्णपणे फोल ठरली असुन एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागात निविदांच्या नावाखाली उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे. परंतु दिव्यांगांना स्टॅाल देण्या करिता काढलेली निविदा जाणीवपूर्वक कशी थांबवता येईल याकरीता महानगरपालिका कार्यरत असतांना दिसुन येत आहे. तेव्हा ६ मार्चच्या आत दिव्यांगाना स्टॉल उपलब्ध करुन दिले नाही तर प्रहार संघटनेच्या वतीने महापालिकेला घेराव करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील यांनी दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेने दिव्यांग बांधवांना स्टॅाल देणे , दिव्यांग बांधवांकरीता स्टॅाल करीता बजेट मध्ये मागील वर्षाची २० लाखाची तरतुद चालू वर्षात वाढवत ८० लाख एवढी करत तात्काळ निविदा प्रक्रियापूर्ण करणे आवश्यक आहे . कारण मागील २० वर्षांपासून दिव्यांग बांधव स्टॅाल पासून वंचित आहेत.
तर दिव्यांग बांधवांच्या गंभीर व अतिगंभीर आजारावरील उपचारांकरीता महानगरपालिका स्तरावरून आर्थिक मदतीचे नियोजन करत त्याबाबत ठराव तात्काळ करण्यात यावा अशी मागणी होत आहे. दिव्यांग भवन उभारण्याबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय घेवुन दिव्यांग कल्याण समिती बाबत त्वरीत निर्णय घ्यावा .
दिव्यांग बांधवांना महानगरपालिका स्तरावरील कंत्राटी सेवेत सामावून घेणे तसेच महानगरपालिका स्तरावरून देण्यात येणाऱ्या कंत्राटात कंत्राटी कर्मचारी म्हणून प्राधान्य देणेबाबत निर्णय घेणे याबाबत तत्कालीन आयुक्त अजिज शेख यांनी दिलेला शब्द पाळणे महत्वाचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिव्यांगांकरीता घरकूल योजना राबवण्याबाबत निर्णय घेवुन
उल्हासनगर महानगरपालिकेद्वारे स्मशान भूमींना मोफत लाकडे पुरवले जात असून लाखो रूपयांचा निेधी ट्रस्ट चालकांना मयतांच्या नावाखाली दिला जात आहे असे असतांना देखील स्मशान भूमीमध्ये मयतांच्या नातेवाईकांकडून मयत इसमाच्या नावाखाली जबरदस्तीने घेतले जाणारे २००० ते २५०० रूपऐ त्वरीत थांबवत स्मशान भूमीच्या ट्रस्ट धारकांवर महापालिकेच्या पैशांचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हे नोंद करत कारवाई करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान स्वामी शांती प्रकाश हॅाल , कुर्ला कॅंम्प रोड उल्हासनगर -५ सदर हॅालचे नाव व स्वरूप येथील धार्मीक भावनेशी जुळलेले आहे असे असतांना स्वामी शांती प्रकाश यांचे नावाने असलेल्या हॅालचे अवैध बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळत आहे सदर बांधकामावर तोडक कारवाई करीत त्वरीत सिंधी धर्मीयांचे गुरू स्वामी शांती प्रकाश यांचे पावित्र्य राखत रितसर बांधकाम परवानगी देत भव्यदिव्य हॅाल बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
दिव्यांग विभागाचे स्थलांतर डॅा.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत केल्यानंतरही कोणतीही सोयी सुविधा नाही . दिव्यांग बांधवांना बसण्याकरीता खुर्ची ,टेबल पुरेसा कर्मचारी वर्ग नसुन याबाबत नियोजन करण्यात यावे . दरम्यान सुभाष टेकडी व दहाचाळ परिसरात पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्यावर सुरू असलेला भेदभाव त्वरीत थांबवत ज्याठिकाणी दलित बहुजन वस्ती आहे त्याच ठिकाणी येणारे पाणी जाणिवपूर्वक थांबविणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे नोंद करुन , डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा दलितांना दिलेला पाण्याचा अधिकार जाणीवपूर्वक फक्त दलित व बहुजन असल्या कारणास्तव हिणावून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी , तसेच दिव्यांग काठी घोटाळ्याप्रकरणी सदर रक्कम अधिकाऱ्याकडुन व निविदा धारकाकडून वसूल करत सदर रक्कम दिव्यांग स्टॅाल करता वापरण्यात यावी तसेच दिव्यांग काठी भ्रष्टाचारातील आरोपींवर दिव्यांग कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावेत .तर दिव्यांगांना मिळणारे मासिक मानधन तूटपुंजे असून साल २०१६ ते आज रोजी पर्यंत बजेट चे ५ टक्के रक्कम दिव्यांग बांधवांकरीता राखीव आहे .
परंतु सदर रक्कम योग्यरित्या व पूर्णपणे दिव्यांगांकरीता खर्च करण्यात आलेली नाही . तर सदर मानधनात आर्थिक वर्षात वाढ करण्यात यावी व दिव्यांगांचे मानधन ४५०० रूपये करण्यात यावे . अशी मागणी निवेदनात केली आहे. तेव्हा ७ दिवसांत तात्काळ निर्णय न झाल्यास सामान्य जनतेच्या हितासाठी दिव्यांगांच्या संविधानिक सुरक्षेकरीता ६ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्त यांचे दालन ताब्यात घेणार असल्याचा इशारा ॲड स्वप्निल पाटील यांनी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात दिला आहे.




