उल्हासनगर , दि . १ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथील शांतीनगर स्मशानभुमीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा विना परवानगी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असुन हा पुतळा अत्यंत अशोभनिय आहे. दरम्यान स्मशानभुमीत पुतळा लावताना कोणताही विचार केला नसुन हा एकप्रकारे अपमान असल्याचे स्पष्ट होते. सदर पुतळा हा स्मशानभुमीतुन स्थलांतरीत करावा या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी बैठकीचे आयोजन करुन संघर्ष योध्दा श्यामदादा गायाकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समिती स्थापन करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅंप ३ येथील शांतीनगर स्मशानभुमीत डॉं . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावन्यात आला आहे. सदर पुतळा हा डॉ .आंबेडकर यांचा आहे की अजुन कोणाचा आहे असा संभ्रम बघणाऱ्याना होतो . त्या पुतळ्या खाली एक दगड लावला असुन त्या दगडावर उल्हासनगर महापालिका , खासदार डॉ . श्रीकांत शिंदे व राजेंद्र चौधरी यांच्या प्रयंत्नातुन असे लिहले आहे. मात्र स्मशानात घटनाकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शासनाची कोणती ही परवानगी न घेता लावलेला असल्याचे समजते. तर सदर पुतळा कोणी लावला हे महापालिकेचे शहर अभियंता शिरसाटे यांना सुध्दा माहीत नसल्याचे त्यांनीच सांगितले असुन लोकानी वर्गणी काढुन सदर पुतळा लावल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे .
दरम्यान स्मशानभुमीतुन डॉ . आंबेडकर यांचा पुतळा सन्मानपूर्वक स्थलांतरित करवा , म्हणुन समाजातील घटकाना एकत्र करुन ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीमध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्याना संघर्ष योध्या श्यामदादा गायकवाड यांनी चांगले मार्गदर्शन केले असुन महापालिकेने सदर पुतळा सन्मानपुर्वक स्थलांतरीत करुन डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत लावावा अशी मागणी केला आहे . जर १५ दिवसात पुतळा स्थलांतरीत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे .यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समितीची घोषणा गायकवाड यांनी केली आहे . या बैठकीला माजी नगरसेवक शांताराम निकम ,कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे , पत्रकार रामेश्वर गवई , जगन्नाथ जावळे , जगदिश सोनकांबळे , प्रफुल्ल भोसले , कुमार रेड्डीयार , राजेश फके , सुरेश जगताप , साहित्यिक सिंधुताई रामटेके, मिरा सपकाळे , पंकज गुरव यांच्यासह शेकडो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.



