अकोला

गावागावातील 60% लाडक्या बहिणीची ekyc मध्ये तांत्रिक चूक

👉 नोव्हेंबर 25 च्या हप्त्यापासून 60% लाडक्या वंचित
👉 जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयात वंचित महिलांची गर्दी
अकोला:महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीना 1500/- रुपये महिना ही लोकप्रिय योजना सुरु केली होती परंतु यात काही अपात्र महिलांचा समावेश झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यावर शासनाने सेतू केंद्रात सर्व लाडक्या बहिणींना ekyc करण्याचे सांगितले मात्र सेतू केंद्रात किंवा स्वतः च्या मोबाईल वर ekyc करताना त्यातील पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने चुकीची माहिती भरल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पात्र असलेल्या 60% महिला नोव्हेंबर 2025 मध्ये मिळणाऱ्या 1500/- रुपये मासिक हप्त्याला मुकल्या आहेत आणि ज्यांना नोव्हेंबर 2025 हप्ता मिळाला नाही

त्या लाडक्या बहिणी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी करत असून त्यांचे आधारकार्ड चेक केल्यावर महिला बाल विकास कार्यालयातील संगणक परिचालक ekyc करतांना चुकीची माहिती अपलोड केल्याचे कारण सांगत आहेत मात्र माहिती चुकल्याने लाडक्या बहीण या योजनेत अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या गावागावात 60% पर्यंत पोहचली असून ही आकडेवारी पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते
शासनाने गावागावातील अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीसाठी परत एकदा शासनाच्या प्रशिक्षित व्यक्ती मार्फत ekyc करून पात्र असलेल्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणं सुरु करावे अशी सर्वसामान्य शहर आणि ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *