टॉप स्टोरी महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती चिंताजनक; बारामतीहून तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलवले

विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ८५ वर्षीय पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून, प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या प्रवासादरम्यान खासदार सुप्रिया सुले या शरद पवार यांच्यासोबत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या ताफ्यात सुसज्ज रुग्णवाहिकेचाही समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंब दुःखात असतानाच, आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या बातमीने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप रुग्णालयाकडून अधिकृत आरोग्य अहवाल (Medical Bulletin) प्रसिद्ध करण्यात आला नसला तरी, शरद पवार लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रार्थना केली जात आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *