स्थानिक नगरसेवक सहित पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
नवी मुंबई:स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर तलवली येथे पार पडलेल्या पहिल्या पाहणी दौऱ्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. यावेळी घणसोली विभाग कार्यालयातील सर्व अधिकारी, महावितरणचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक गणेश सकपाळ तसेच विविध विभागाचे ठेकेदार उपस्थित होते. याप्रसंगी परिसरात असलेल्या उपलब्ध समस्या कशा सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली.
या पाहणी दौऱ्याचे आयोजन नगरसेवक गणेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले होते.तलवली येथील स्मशानभूमी येथे घणसोली विभाग कार्यालयातील,महावितरणचे अधिकारी एकत्रित मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जमा झाले.त्यानंतर या ठिकाणी असलेल्या नागरी सुविधा संदर्भातील पाणी पुरवठा,मलनिस्सारण वाहिन्या,स्थापत्य,स्वच्छता,उद्यान,स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली.तसेच येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्याला भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या त्यांनी लेखी व तोंडी उपस्थितांच्या समोर मांडल्या.त्यानंतर तत्काल नागरी सेवा सुविधा कशा सोडविता येतील.यावर निर्णय घेण्यात आला.हा पाहणी दौरा साधारणता तीन तासांनी म्हणजेच दुपारी दोन वाजता समाप्त झाला.
दरम्यान,अशा प्रकारचा पाहणी दौरा तलवली परिसरात पहिल्यांदाच राबविण्यात आला.त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या पाहणी दौऱ्यात परिसरातील लतिका पाटील, शंकर पाटील, रामचंद्र पाटील ,चंद्रकांत पाटील,मनोज वैती,प्रमोद पाटील,अक्षय पाटील,संदीप पाटील,राहुल पाटील,सुशांत पाटील,नारायण म्हात्रे,प्रदीप पाटील आदिसहीत नागरिक,राजकीय पदाधिकारी,सामाजिक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी घणसोली विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे, ,महावितरणचे अतिरिक्त अभियंता अजय भसाखात्रे ,मनपाचे उप अभियंता रमेश गुरव, सहाय्यक अभियंता नितीन जाधव,संतोष गवई प्रवीण विश्वे,मंगेश मेहेर,रितेश पुरव,सखाराम खाडे,स्वच्छता अधिकारी वीरेंद्र जाधव,अतिक्रमण विभागाचे सुनील मोरे आदींसह पाणी पुरवठा,स्वच्छता,मलनिस्सारण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.




