नाशिक

नंदुरबारमध्ये 8.50 लाखांची लाच घेताना सा.बां.चा उपअभियंता अटकेत

नाशिक परिक्षेत्रामध्ये असलेल्या नंदुरबार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागामध्ये असलेले उपाभियंता नितीन इंगळे यांनी ठेकेदाराने 41 कोटी रुपयांचा काम केल्यानंतर त्याच्याकडून पहिले मंजूर करताना आठ लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पहिले बिल मंजूर करताना यातील काही रक्कम स्वीकारली गेली होती त्यानंतर ठेकेदाराने दुसरे बिल मंजूर करताना काही रक्कम दिली होती सही करून पाठविण्यासाठी म्हणून उपाभियंता नितीन इंगळे यांनी नकार दिला आणि जोपर्यंत उर्वरित रक्कम मिळत नाही. तोपर्यंत पुढील बिलावरती सही करणार नाही असे सांगून उपअभियंता नितीन इंगळे यांनी नकार दिला या संदर्भामध्ये नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली आणि त्यानंतर आज सोमवारी दुपारच्या सत्रामध्ये उप अभियंता नितीन इंगळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे , अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक यशवंत दराडे आणि पथकाने केली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *