नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका राजकीय वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. सानपाडा प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना, या प्रभागातील प्रभावी नेते मिलिंद सूर्यराव यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदे गटाची स्थापना झाल्यापासून आपण पक्षासोबत प्रामाणिकपणे काम केले, मात्र अचानक पक्षात आलेल्या नव्या लोकांना उमेदवारी देण्यात आली, असा गंभीर आरोप मिलिंद सूर्यराव यांनी केला आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिलिंद सूर्यराव आणि त्यांचे सहकारी काल भाजपमध्ये प्रवेश करून भाजपाचा प्रचार करणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे सानपाडा प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना मोठा फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी बळकटी देणारा तर शिवसेना शिंदे गटासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.



