नवी मुंबई

नवी मुंबईत हवा प्रदूषण प्रतिबंधाकरिता ठिकठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा

नवी मुंबई:महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्ता सुधारणेसाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येत असून विशेषत्वाने सायन पनवेल महामार्गावर नियमितपणे डिप क्लिनींग ड्राईव्ह राबविण्यात येत आहे.

काल तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत सायन पनवेल महामार्ग तसेच सानपाडा तुर्भे दत्तमंदिर परिसर येथे सखोल स्वच्छता मोहीम राबवून वायू प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने धूळ, माती सफाई करून उचलून नेण्यात आली. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अति आयुक्त सुनील पवार, उप आयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, तुर्भे विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्यासह, स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

त्यासोबतच विविध ठिकाणच्या स्वच्छता मोहीमांमध्ये लोकसहभागावर भर दिला जात असून नमुंमपा कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत इस्कॉन एलिव्हेटर्स प्रा. लिमी. यांच्या सहभागातून संयुक्तपणे इलेक्ट्रिक झोन एम. आय. डी. सी महापे येथे दुपारच्या कालावधीत सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये इस्कॉन कंपनीचे संचालक शामी कुनेल, उपाध्यक्ष श्रीम. लता नाम्बीयार व महादेव राऊत आणि कंपनीतील १०० हून अधिक कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये कोपरखैरणे विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांनी एकत्रितपणे १५० किलोहून अधिक कचरा जमा केला.

अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम दिघा विभाग कार्यक्षेत्रातील कन्हैया नगर ते इलठण पाडा कच्च्या रस्त्यापर्यंत राबविण्यात आली . वाशी विभाग कार्यक्षेत्रातील वाणिज्य क्षेत्र, सेक्टर ३० ए, वाशी येथेही सखोल सफाई मोहीम घेण्यात आली

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *