नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्र.२३ ब च्या नगरसेवक पदास न्यायालयाचा १२ फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता स्थगिती आदेश

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 23ब मधून निवडून आलेल्या नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी नायालयात याचिका दाखल.त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पदावर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती घातली आहे.

पुढील सुनावणी होईपर्यंत तसेच संबंधित प्रतिवादीने आपले स्पष्टीकरण (उत्तर) दाखल करेपर्यंत त्या स्वतःला नगरसेवक म्हणून सादर करू शकणार नाहीत किंवा नगरसेवक पदाशी संबंधित कोणतेही अधिकृत कामकाज त्या करू शकणार नाहीत, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने सर्व प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ही स्थगिती कायमस्वरूपी का करू नये याबाबत त्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या नोटीसीची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, याचिकाकर्त्यास दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश ३९ कलम ३ नुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या या आदेशामुळे प्रभाग २३ब मधील नगरसेवक पदाच्या अधिकारांबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, पुढील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर आणि महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *