समाजाला पुढे नेण्याचे काम बाबांनी केले:चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री व पालकमंत्री.
भव्य सेवक मेळाव्यात सेवकांना केले मार्गदर्शन
मौदा :पावडदौना आश्रम येथे सेवकांची अलोट गर्दी
मौदा: गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परमात्मा एक मानव धर्म आश्रम येथे सोमवार२६ जानेवारी करण्याचे ठरविण्यात आले आहे.ह्या भव्य सेवक मेळाव्याचे अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने होते.
कार्यक्रमाला उपस्थित महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, मंत्री आशिष जायश्वाल, आमदार कृपाल तुमाने, नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने, उपाध्यक्ष देवराव तुमसरे, सचिव किरण राऊत, सहसचिव प्रदिपकुमार चौधरी, कोशाध्यक्ष सुभाष दहिकर, संचालक तापेश्वर वैद्य, ईश्वर चिचघरे, रवींद्र खापरे, रमेश नखाते, रामेश्वर जोगी, महेंद्र गुरुबेले, टिकाराम पराते, गुलाब साठवणे, सुरेश कळंबे, हेमराज शिंदेकर मार्गदर्शक कीर्तीवान जीभकाटे, नरहरी व्यनकटकर शरद लांजेवार व अनेक मार्गदर्शक, व्यवस्थापक खुशाल जगनाडे, कैलास लांजेवार, पांडुरंग शेंडे व हजारो मार्गदर्शक व लाखो सेवक भव्य सेवक मेळाव्यात उपस्थित होते.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम पावडदौना मौदा येथे सकाळी हवन कार्य घडविण्यात आले. अध्यक्ष रवींद्र गायधने यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. भव्य कला प्रदर्शनिचे उदघाटन करून सेवकांना पाहण्यास सुरुवात केली. ढोलतासा च्या गजरात भव्य मेळाव्यात पदार्पण केले. भगवान बाबा हनुमानजी च्या प्रतिमेचे पूजन केले. महान त्यागी बाबा जुमगेवजी व आई वारणाशी याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव किरण राऊत यांनी केले. आभार रवींद्र खापरे यांनी मानले तर सायंकाळची प्रार्थना रामेश्वर जोगी यांनी केली.
स्वतः मध्ये मी पणा आणू नका आम्ही म्हणून काम करा….
बाबांनी कधीच मी पणा आणला नाही. सेवकांना घडवून दुःख दूर केले. निःस्वार्थ सेवा केली. मी आला तिथ अहंकार येतो. आम्ही आला तिथ सेवकांचा विकास येतो. मनून मीपणा आणू नका आम्ही म्हूणन काम करा. महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो सेवकांना अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे दुःखी गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय देऊन निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर चे संस्थापक व सेवकांचे सतगुरू महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणी प्रमाणे मार्गदर्शना नुसार जनजागृती करीत्ता दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक हवन कार्य, झेंडावंदन,, मानव धर्म भव्य सेवक मेळावा व सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम सन १९९९ पासून सुरु आहे. आणि समोरही सुरु राहणार. असे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी सांगितले
तहसील व पोलीस विभागातर्फे मोलाचे सहकार्य….
आश्रमला येणाऱ्या सेवकाची गैरसोय होऊ नये ह्याकरिता उपविभागीय अधिकारी संजय पवार, मौदा तहसीलदार दत्तात्रय निबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांना यंत्रणा सज्ज केली काटेकोर बंदोबस्त करून सेवकांना सुलभ आश्रमला येता जाता आले.
महाणत्यागी बाबा जुमदेवजींच्या जीवनावर उत्कृष्ठ कलाप्रदर्शनी…
महाणत्यागी बाबा जुमदेवजींच्या जीवनावर आधारित उत्कृष्ठ कळप्रदर्शनी करण्यात आली. यात बाबांचा विनकारांचा व्यवसाय,भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला,
बाबांचा संदेश, बाबांचा बैलबंडी दौरा,मोगरकसा तलाव,मानव मंदिर असे अनेक प्रशंग हुबेहूब दाखवण्यात आले. प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस व इतर झाकिंना उत्कृष्ठ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार असे मंडळाचे सचिव किरण राऊत यांनी सांगितले.
समाजाला पुढे नेण्याचे काम बाबांनी केले…… चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री व पालकमंत्री….
शासनाने दारू बंदी करण्याक्तीता अनेक योजना आणल्या परंतु दारू बंद झाली नाही. परंतु महाणत्यागी बाबा जुमदेवजी फुकटात सेवकांचे व्यसन सोडवून त्यांना सुखी केले. सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण दिली.. समाजामध्ये मानस घडवले. व्यसन मुक्त समाज केले. आणि समाजाला पुढे नेण्याचे काम बाबांनी केले असे मतचंद्रशेखर बावनकुळे यांनी भव्य सेवक संमेलनात बोलतांना व्यक्त केले.




