मौदा:- परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम पावडदौना, मौदा येथे आज भव्य सेवक मेळावा आयोजित केला त्यानिमित्ताने आश्रम पासून मौदा शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी टाकून स्वछ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आश्रम रोड उडाण पूल खाली रस्ता उडाण पूल ते आश्रम पर्यंत रस्ता मौदा शहराकडे जाणारा मुख्य रस्ता यामध्ये पाण्याची टँकी आणून मौदा येतील सेवकाने खूप सहकार्य केले यात उपस्थित मौदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रसन्ना (राजाभाऊ)तिडके, मौदा येथील मार्गदर्शक पांडुरंग मदनकर, सेवक मोरेश्वर राजगिरे, क्रिष्णा वंजारी,पुरुषोत्तम डोरले,नत्थू ठोंबरे, प्रकाश अतिलकर, मनीष चवरे, देविदास लारोकर, अतुल मदनकर केसलापूर येथील मार्गदर्शक दिलीप वाडिभस्मे, सेवक दिनेश मानकर, चंद्रभान बावणे, चंद्रशेखर मेश्राम, सोमेश्वर बावणे, राजन बावणे, शेषराव बावणे व आम्ही मौदा आश्रम स्वयंसेवक ग्रुप यांनी मोलाचे सहकार्य केले.




