बदलापूर

बदलापूर नगरपरिषदेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

बदलापूर, दि.३, प्रतिनिधी:बदलापूर शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी बदलापूर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला असून ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. आज दि.३ रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा दुसरा दिवस असून शहरातील मोहन पाम परिसर, पनवेल हायवे तसेच अंबरनाथ–बदलापूर रस्ता, बदलापूर पूर्व या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. एमएसईडीसीएल (वीज वितरण कंपनी) च्या सहाय्याने ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा दिला जात होता, त्या ठिकाणी संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आधीच वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होते. नगरपरिषदेने दिलेल्या नोटिसीकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकामधारकांवर ही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनावर, वाहतुकीवर तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी केले आहे.

कारवाईदरम्यान बदलापूर पूर्व येथील डी-मार्ट परिसरात असलेल्या फर्निचर दुकानांवरही कारवाई होणार असल्याची सूचना संबंधित दुकानदारांना देण्यात आली होती. या संभाव्य कारवाईमुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती लक्षात घेता, अनेक दुकानदारांनी नुकसान टाळण्यासाठी तातडीने फर्निचर अत्यंत स्वस्त दरात विक्रीस काढले. त्यामुळे परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

स्वस्त फर्निचर खरेदीसाठी मोठी गर्दी
बदलापूर पूर्व येथील डी-मार्ट परिसरात असलेल्या फर्निचर दुकानांवरही कारवाई होणार असल्याची सूचना संबंधित दुकानदारांना देण्यात आली होती. या संभाव्य कारवाईमुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती लक्षात घेता, अनेक दुकानदारांनी नुकसान टाळण्यासाठी तातडीने फर्निचर अत्यंत स्वस्त दरात विक्रीस काढले. त्यामुळे परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

६ गाळे जमीनदोस्त मात्र त्याच जागेवरील नगरपरिषदेचा जेष्ठ नागरिक कट्टा शाबूत
कात्रप परिसरातील ६ अनधिकृत गाळे या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. मात्र याच ठिकाणी असलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा हा बदलापूर नगरपरिषदेच्या माध्यमातूनच उभारण्यात आला होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. कारवाईनंतरही हा कट्टा जागेवर तसाच शाबूत असल्याने “जर ही जागा अनधिकृत होती, तर मग हा कट्टा अधिकृत कसा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून “मोठ्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून लहान गाळे व गरीब व्यावसायिकांवरच कारवाई केली जात आहे. प्रशासन गरिबांना त्रास देत आहे” असा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपरिषदेच्या कारवाईत समानता व पारदर्शकता असावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्याधिकारी भडकले. १० मिनिटांमध्ये सगळं खाली करा !
कारवाईदरम्यान परिस्थिती पाहून बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे चांगलेच भडकले. कारवाईत होत असलेल्या दिरंगाईवर त्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. “दहा मिनिटांच्या आत सगळे अनधिकृत बांधकाम खाली करा” अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना तात्काळ आदेश दिले. मुख्याधिकाऱ्यांच्या या कडक भूमिकेमुळे कारवाईला वेग आला आणि काही वेळातच संबंधित अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आले.
अश्रू अनावर; कारवाईला विरोध करत थोड तरी बांधकाम ठेवा!
कारवाई सुरू असताना दुकानदारांचे अश्रू अनावर झाले. अनेक दुकानदारांनी हात जोडून कारवाईला विरोध करत “आमचं सर्वस्व याच दुकानावर अवलंबून आहे, किमान थोडं तरी बांधकाम ठेवा” अशी विनवणी केली. मात्र प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे त्यांची विनवणी निष्फळ ठरली. कारवाईमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *