मुंबई दि. २७ प्रतिनिधी:संधिकाली या अशा… या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ प्रयोग शनिवार, ३१ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह बोरिवली (प.) येथे होणार आहे. प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असलेले रंगकर्मी राजन काजरोळकर या एकपात्रीचे सादरीकरण करणार आहेत. तर या एकपात्रीचे लेखन आणि दिग्दर्शन विनिता पिंपळखरे यांनी केले आहे.
‘संधिकाली या अशा’ हे एकपात्री बहुरूपी सादरीकरण आहे. आजकाल माणूस सारखा धावत असतो. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मुलेबाळे, संसार! मग अचानक नोकरीतून निवृत्त झाल्यावर माणूस अगदी रिकामा होतो. एक पोकळी निर्माण होते. वेळेचं काय करावे कळत नाही. रिकामपण त्याला झेपत नाही. पण हाच खरा काळ असतो, सुखात जगण्याचा,आराम करण्याचा, जगण्याचा आनंद घेण्याचा! माधव कुलकर्णी त्यांच्या आयुष्याच्या बदलत्या काळाशी कसे जुळवून घेतात, त्याचे हे साधीसुधे गंमतीशीर नर्म विनोदी सादरीकरण आहे. असे सादरकर्ते राजन काजरोळकर यांनी सांगितले.
gajanantupe2@gmail.com




