बदलापूर

मलनिस्सारण व्यवस्थेस गती; कुळगांव–बदलापूर नगरपरिषदेस दोन अत्याधुनिक वाहने प्राप्त

बदलापूर, दि.२५,प्रतिनिधी:कुळगांव बदलापूर शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या १८.५ टन क्षमतेच्या सक्शन कम जेटिंग विथ वॉटर रीसायकलिंग यंत्राच्या दोन अत्याधुनिक वाहनांचा लोकार्पण सोहळा रविवार,दि २५ जाने. रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. आपटेवाडी बदलापूर (पूर्व) येथील स्थामी समर्थ मठाजवळील कार्यक्रमस्थळी हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन कुळगांव बदलापूर नगरपरिषद पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती सभापती शैलेश वडनेरे यांनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक सुनील मेने यांनी केले. या प्रसंगी आमदार किसन कथोरे, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा तथा शिक्षण विभाग सभापती प्रियंका दामले, मा. नगराध्यक्ष/ नगरसेवक राजेंद्र घोरपडे,भाजप गटनेते शरद तेली, शिवसेना गटनेते श्रीधर पाटील,नियोजन व विकास समिती सभापती संभाजी शिंदे, स्वच्छता, वैद्यकिय व आरोग्य समिती सभापती किरण भोईर,नगरसेवक प्रफुल्ल मोरे, नगरसेवक आदित्य पाटील, नगरसेविका रती पातकर, नगरसेविका ज्योती डार्विन, नगरसेवक सौरव लाड नगरसेवक मोहन चतुरे, बदलापूर भाजप महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

लोकार्पण सोहळ्यात बोलताना नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याचे आवाहन केले. तर आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरला महापालिका दर्जा मिळवण्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू असून पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *