नागपूर जिल्हा रामटेक

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रामधाम तीर्थ (मनसर) येथे ‘नामा’ अभंग संगीतमय एकपात्री प्रयोग संपन्न

रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक तालुक्यातील मनसर येथील प्रख्यात रामधाम तीर्थ मनसर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दि.१५ फरवरी ला सायंकाळी ६ वाजता “नामा” या अभंग संगीतमय एकपात्री प्रयोगाचे ज्ञान योगी डॉ. दत्ताजी हरकरे यांनी सादरीकरण केले.

हा प्रयोग चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने रामधाम येथील माॅ पार्वती सभागृह येथे सादर करण्यात आला. डॉ. दत्ताजी हरकरे यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय व वाणीने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. त्यांनी संत नामदेवाच्या आत्मकथेतून भगवान विठ्ठल व माऊली ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण जीवन गाथेवर प्रकाश टाकत वातावरण भक्तीरसात विठ्ठलमय केले. तत्पूर्वी सायंकाळी ६ वाजता रामधाम येथे बाबा बर्फानी चे दर्शन घेतले व श्रावण मासाच्या प्रथम सोमवारला उघडणारे बाबा बर्फानीचे कपाट महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर समस्त भाविकांच्या उपस्थितीत कपाट बंद करण्यात आले. सायंकाळी रामधाम येथील चंद्र पर्वताच्या आत असलेल्या अष्टविनायक बारा ज्योतिर्लिंग व माता वैष्णव देवीचे दर्शन घेऊन जगातील सर्वात मोठा ओम परिसरातील रामायण व कृष्ण लीला प्रसंगावरील देखाव्यांचे दर्शन घेतले.
यावेळी ज्ञान योगी डॉ. दत्ताजी हरकरे, रामधाम तीर्थक्षेत्राचे संस्थापक चंद्रपाल चौकसे, संस्थापिका संध्या चंद्रपाल चौकसे,कन्हान चे माजी नगराध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, रजनीश मेश्राम, अनिल वाघमारे,जगदिश सांगोडे,नंदकिशोर पापडकर, रोहित मानवटकर, सुनील लाडेकर, सुनील सार्वे, बबलू दूधबर्वे, मंगेश कठोते या समस्त मान्यवरांच्या शुभ हस्ते भगवान नटराजाच्या मूर्तीला माल्या अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञान योगी डॉ. दत्ताजी हरकरे यांचे
चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शाल, हार, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *