मुंबई

माहीम मच्छिमार कॉलनी वाहतूक सिग्नल दुर्लक्षित – पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

मुंबई : प्रतिनिधी,माहीम येथील लेडी जमशेदजी (एल.जे.) मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या मार्गावरील माहीम मच्छिमार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला वाहतूक सिग्नल सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. सिग्नल अस्तित्वात असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या चौकात सौंदर्यीकरणाचा अभाव असून पादचाऱ्यांसाठी असलेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या अस्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरू असतानाही अनेक वेळा वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून मार्ग ओलांडत असल्याचे चित्र दिसते. या ठिकाणी लहान विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.
तात्काळ उपाययोजना कराव्यात!
या पार्श्वभूमीवर सदर सिग्नल चौकात स्पष्ट झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नलची तातडीने दुरुस्ती, योग्य रंगकाम तसेच आवश्यक सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. संबंधित प्रशासन व वाहतूक पोलिसांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *