मुंबईमध्ये ठाकरे सेना गटाचा महापौर विराजमान व्हावा यासाठी ठाकरे सेना गटाचे भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे पुढे युतीचा प्रस्ताव ठेवला. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सेनासोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
उद्धव ठाकरे सेना व शिंदे सेना युतीबाबतच्या प्रस्तावावर संजय राऊत पुढे म्हणाले की काहीही झाले तरी शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही. भाजप युतीने पैशाचा वापर करून निवडणुका जिंकल्या हा बाळासाहेबांचा विचार नाही.यावर एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे की अशी कोणत्याही प्रकारची युती होणार नाही मुंबईमध्ये भाजप युतीचाच महापौर बसेल.




