टॉप स्टोरी नागपूर जिल्हा रामटेक

रामटेकमध्ये तीन दिवस रंगणार सांस्कृतिक महोत्सव

दिग्गज कलाकारांची हजेरी : 30 जाने. ते 1 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम लावणार हजेरी

रामटेक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रामटेक सांस्कृतिक महोत्सव २०२६ रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध कलाविष्कार सादर केला जाणार आहे. ३० जानेवारी २०२६ ला सुदेश भोसले, ३१ जानेवारीला कुमार विश्वास, व १ फेब्रुवारीला सोनु निगम यांच्या संगीतमय कार्यक्रम होणार आहे.

यापूर्वी जनतेचा सहभाग वाढावा यासाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. २८ जानेवारी पासून क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात बुध्दीबळ, कबड्डी, बॅडमिंटन, स्केटिंग, नौकानयन, हाॅलीबाल, मेहेंदी, रांगोळी, कुस्ती, मॅराथॉन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी बक्षीसांची लयलुट होणार आहे.

रामटेक सांस्कृतिक महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंग ची व्यवस्था ठिक ठिकाणी केली आहे. महिला बचत गटांना आर्थिक मदत व्हावी यासाठी खाद्य पदार्थाचे स्टाॅल लावले जाणार आहे. रामटेक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे आयोजक राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, नगरपरीषदचे उपाध्यक्ष आलोक मानकर,ऋषीकेश किंमतकर सह आदी उपस्थित होते. रामटेकचे नाव भारतात प्रसिद्ध होवुन विविध प्रकारचे उपक्रम राबविले जावे व रामटेकचा सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी जनतेने यात सहभाग घेऊन हा महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *