नवी मुंबई

वायू प्रदूषण रोखण्यासाठी 7 बांधकामांवर काम बंदची धडक कारवाई

नवी मुंबई:महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल करून घेललेली जनहित याचिकेच्या आदेशानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंग करीता अवलंबवायची ‘मानक कार्यप्रणाली’ व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण दंडात्मक कारवाईबाबतची नियमावली मानक कार्यप्रणाली अन्वये दंडात्मक शुल्क भरणा करणेबाबत संबंधित विकासक,बांधकाम धारकांस कळविण्यात आलेले असताना पालन न करणाऱ्या वर कारवाई करण्यात आली आहे.

सुरु असलेल्या बांधकाम व विकास कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता सदर पाहणीमध्ये बांधकाम प्रकल्पाच्या परिघाभोवती किमान 30 फूट उंच टिन धातूचे पत्रे लावणे आवश्यक असताना प्रकल्पावर त्यापेक्षा कमी उंचीचे टिन धातूचे पत्रे आढळून आले. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना सर्व बाजूने हिरव्या कापडाच्या ओल्या ज्यूट शीटच्या ताडपत्रीने बंद केलेले आढळून आलेले नाही. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडींग आणि अनलोडींग करताना वॉटर फॉगींग केले जात नाही.

बांधकाम मजुरांनी मास्क, गॉगल्स, अॅप्रॉन इ, परिधान केलेले आढळून आले नाही.बांधकाम स्थळाच्या सभोवतालच्या 500 मीटर पर्यंतच्या परिसरात व रत्यांवर धूळ प्रदुषण होऊ नये याकरिता पाणी फवारणी यंत्र कार्यान्वित असल्याचे आढळून आले नाही. घनमाती व बांधकाम साहित्य इत्यादी वाहतूक करताना हिरव्या कपड्याने झाकलेले आढळून आले नाही. या पाहणी दरम्यान बांधकाम स्थळाच्या ठिकाणी कोणीही जबाबदार प्रतिनिधी, व्यवस्थापक उपस्थित नव्हते.

तसेच हवा प्रदूषणात होणा-या वाढी संदर्भात उच्च न्यायालय, मुंबई यांची स्वतःहून दाखल करून घेतलेली जनहितार्थ याचिका क्र. 3/2023 च्या आदेशान्वये धूळ व प्रदूषण रोखण्याकरिता विकासक, बांधकाम धारक यांचेमार्फत तातडीने उपाययोजना करणेबाबत आवश्यक आहे. परंतू या बाबत योग्य उपाययोजना केल्या नसल्याने

मे. साई अमृत बिल्डर्स, भुखंड क्र. 16 व 17, सेक्टर 20, सानपाडा, मे. मेट्रीक्स बिल्डर्स, भुखंड क्र. 10, सेक्टर 19, सानपाडा , मे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स, भुखंड क्र. 12, सेक्टर 20, सानपाडा, मे. कामधेनु ग्रीन, भुखंड क्र. 6 व 7, सेक्टर 19, सानपाडा, मे. रॉयल पाम डेव्हलपर्स DPVG Ventures LLP, भुखंड क्र. 9B, सेक्टर 20, सानपाडा, मे. कामधेनु लाईफ स्पेस, भुखंड क्र. 18 व 25, सेक्टर- 8, सानपाडा, मे. सत्यम लाईफ स्पेस, भुखंड क्र. 07, सेक्टर 16ए, सानपाडा, आदी वर कारवाई करण्यात आली आहे.

या मोहिम महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या आदेशान्वये, अति. आयुक्त डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे, यांचे नियंत्रणाखाली, तुर्भे विभागातील स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये राबविण्यात आली. या मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते.

यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण रोखण्याकरिता सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *