नवी मुंबई

वाशी येथे आंतरशालेय विज्ञान व तंत्रज्ञान खोज २०२५ स्पर्धा संपन्न

नवी मुंबई:श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ न्यू बॉम्बे सीसाइड यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे आंतरशालेय विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावरील “खोज २०२५ ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वाशी येथील भारतीय विद्या भवन येथे ही स्पर्धा पार पडली. यंदा ‘खोज’ स्पर्धेचे सातवे वर्ष असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, नवकल्पना आणि कुतूहल वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता असे श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आर. राधाकृष्णन यांनी सांगितले.

नवी मुंबई आणि नवीन पनवेल येथील सर्व शाळांसाठी ही स्पर्धा खुली होती. स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली— ज्युनिअर (इयत्ता सातवीपर्यंत) आणि सिनिअर (इयत्ता आठवी ते दहावी). यंदा एकूण ८६ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ३० ज्युनिअर व ५६ सिनिअर संघांचा समावेश होता. यात २२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला; त्यात ज्युनिअर गटातील १७ शाळा आणि सिनिअर गटातील २९ शाळा सहभागी होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प अत्यंत नाविन्यपूर्ण आणि कल्पक होते.
स्पर्धेचे परीक्षण सात नामवंत परीक्षकांनी केले. परीक्षकांनी प्रत्येक प्रकल्पाचे सखोल परीक्षण करून विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला.
विजेत्यांना रोख बक्षिसे, पदके आणि गुणवत्ताप्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
प्रथम पारितोषिक १० हजार रुपये,
द्वितीय पारितोषिक ६ हजार रुपये,
तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये,
ज्युनिअर गटातील विजेते :
* प्रथम पारितोषिक: साई होली फेथ हायस्कूल – “स्पेस डेब्रिस अँड सोल्युशन” (समीक्षा सावंत, त्रिशा सावंत)
* द्वितीय पारितोषिक: एनएमएमसी शाळा – “महिलांसाठी सुरक्षा उपकरण” (आरोही युवराज अतुगडे, शितल दिलीप राठोड)
* तृतीय पारितोषिक: एनएमएमसी शाळा क्रमांक १५ – “स्मार्ट रोड शीट” (प्रणय शिरसाठ, ऋतिका चव्हाण)
सिनिअर गटातील विजेते :
* प्रथम पारितोषिक: एनएमएमसी शाळा क्रमांक १८ – “शॉपिंग विथ क्लिनिंग ट्रॉली” (सुशांत कुमार अजय सिंग, सुरज महादेव धनगर)
* द्वितीय पारितोषिक: ऐरोली माध्यमिक विद्यालय – “मॉडर्न व्हीलचेअर” (रुद्र विकस साळुंखे, प्रज्वल दुसवास नरांगकर)
* तृतीय पारितोषिक (संयुक्त): एनएमएमसी शाळा क्रमांक ११६ – “सेफ्टी बॅग” (एलेश राजू माळा, भरत धोमडीबा)
– आपीजे स्कूल, नेरुळ – “फ्युजन ग्रिड – फोर फोर्सेस, वन फ्युचर” (आदित्य बाबर, समृद्ध श्रीवास्तव, श्रीपाद श्रीनिवास)

या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून अपमोसीस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिभू पाधी उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना नेहमी उच्च ध्येय ठेवण्याचे आवाहन केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *