वर्धा

संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सव ,घोराडमध्ये उसळला जनसागर

संत केजाजी महाराजांचे जयघोषाने दुमदुमली पंढरी

सेलू ः विदर्भाची प्रतीपंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराजांची 119 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सोमवारी भव्य दिव्य अशा पालखी दिंडी सोहळ्यात विविध गावांतील 320 चे वर भजनी मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने गावात भक्तांचा जनसागर उसळला होता यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गावात जणू भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले यात टाळ मृदगांचे तालावर नाचणारे वारकरी आणि हरिनामाचा गजर पाहता संत केजाजी महाराजांचे जयघोषाने घोराड नगरी जणू दुमदुमली होती

येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सकाळी अकरा वाजता पालखी निघाली यावेळी मुख्यप्रवेशद्वारावर रथाचे पुजन ,ज्ञानेश्वर महाराज भादंककर तथ अभ्युदय मेघे यांचे हस्ते पार पडले यात विविध मंडळानी तयार केलेले आकर्षक रथ, दाखल झालेले अश्व, बँडपथक, आणि भजनी मंडळाचा सहभाग असलेला हा दिंडी सोहळा हरिनामाचा जयघोष करीत मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालत संत नामदेव महाराज समाधी स्थळावर पोहचल्यावर तिथे अश्वाचे रिंगण पार पडले.

यावेळी हातात भगव्या पताका घेत धावणारे वारकरी, विणेकरी, पकवाज वादक, डोक्यावर तुळसी वृंदावन, पारायण गाथा घेऊन धावा करीत सहभागी झालेल्या महिला आणि हरीपाठ मंडळाचे वतीने मानवी साखळी द्वारे उंच मनोरा करीत वाजविला जाणारा पकवाज हे सगळे क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले हे क्षण पाहण्यासाठी मैदानावर भाविकांची महिलांची मोठी गर्दी उसळली होती.

या पालखी सोहळ्यानिमित्त गावातील रस्त्यावर महिलांनी रांगोळ्या काढून रस्त्याची सजावट करण्यात आली होती ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या पालखी गावातील प्रमुख मार्गाने जात असताना ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले यात सहभागी भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी अल्पोपोहार, चहापाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती मुख्य मार्गाने दिंडी पालखी ग्रामपंचायत मार्गे दुपारी पाच वाजता मुख्य मंदिराजवळ येताच या दिंडी सोहळ्याची सांगता झाली त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *