टॉप स्टोरी महाराष्ट्र

सिंचन घोटाळा वरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा

1999 मध्ये भाजप शिवसेना युतीच्या काळात पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपया वरून 310 कोटी पर्यंत नेण्याचा आरोप अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे की एवढी वर्ष हा भ्रष्टाचार तुम्ही का लपवून ठेवला? यात तुम्ही सामील असाल?

राज्यात काँग्रेसची सत्ता 1999 मध्ये आली. त्या आधीच्या युतीच्या काळामध्ये पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाचे 200 कोटींची किंमत 310 कोटींपर्यंत नेण्यात आली. पार्टी फंडासाठी शंभर कोटींची मागणी सिंचन प्रकल्पाकडे करण्यात आली होती तर संबंधित अधिकाऱ्यांनी दहा कोटी आपले जोडून 310 कोटी पर्यंत हा प्रकल्प नेला असा आरोप अजित पवार यांनी भाजप पक्षावर केला आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांनी जोरदार पलटवर करीत सवाल केला आहे ही माहिती तुम्हाला होती तर इतके वर्ष हा भ्रष्टाचार का लपवून ठेवण्यात आला. तुम्हीही यात सामील असण्याची शक्यता आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *