वर्धा

सिंदीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत न. प. चा ठराव घेऊन प्रस्ताव. घेऊन शासनाकडे पाठवा

सिंदीवाशी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिले नगराध्यक्षांना निवेदन

सिंदी रेल्वे….वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे १९४८ पासून क वर्ग नगर परिषद आहे व १९९० पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी सध्या शहराची लोकसंख्या २२ ते २५ हजार असून शहराच्या १० कि. मी अंतराच्या आत २५ ते ३० खेडे येतात. या खेड्यापाड्यातील लोक सुद्धा आरोग्य सुविधेकरीता याच सिंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर निर्भर आहे.

सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सोडल्यास कोणत्याही इतर मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या आजाराची तपासणी व उपचार होत नाही. परिणामी मोठ्या संख्येने रूग्णांना येथून स्वतःच्या उपचारा करिता ४० कि. मी. वर्धा, सेवाग्राम किंवा ५० कि. मी नागपूर ला जावे लागते व उपचारा करिता पोहचायच्या आधीच बरेच रुग्ण दगावलेले आहेत. शहरात लॉजेस्टिक पार्क चे काम सुरू असुन भविष्यात शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

सदर्ह वरील सर्व बाबी शहराची व शहराच्या आजुबाजुच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लक्षात घेता जनतेच्या आरोग्य व उपचारा करिता सिंदी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतचा नगर परिषदेचा ठराव घेऊन देवेंद्र फडणविस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व प्रकाश आंबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असे निवेदन नगराध्यक्षा राणी कलोडे यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना अमोल सोनटक्के, गंगाधर कलोडे, मुन्ना शुक्ला, गजानन खंडाळे, दिलीप बावणे, प्रशांत घंगारे, धनराज झिलपे, रामेश्वर घंगारे, संजय तडस, रामभाऊ सोनटक्के, शिवम तडस, मिलिंद पेटकर, प्रभाकर तडस, रवी वाघमारे, महेश राऊत, जमील खान, पंकज पराते, वामन ढोक, यश बालपांडे, आफताब कुरेशी इत्यादी सिंदीवासी व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *