बोर ब्लास्टींगमुळे नागरीकांच्या जिवास धोका
शासकीय नियमाचे उल्लंगन
भिवापूर (राजेश जांभुळे )भिवापूर पासून २५ किमी अंतरावर मांगरुड हे गाव आहे. येथील लोकसंख्या १७६१ इतकी आहे. लगतच असलेल्या मांगरुड फाट्यावरून उमरेड -चिमूर हा राज्य मार्ग तसेच उमरेड – समुंद्रपूर – हिंगणघाट हा मार्ग जात असल्याने या मांगरुड फाट्याला विशेष महत्व आहे. या मांगरुड परिसर व गोटाळी चारगाव परिसरात सभोवताल २० ते २५ स्ट्रोन क्रशर मोठया प्रमाणात आहे.
या स्ट्रोन क्रशर च्या मालकांनी महसूल ( राजस्व ) विभागाने दिलेल्या परवानगी पेक्षा वाजवी पेक्षा ज्यास्त उत्खनन करण्याचा गोरखधंदांच सुरू करून शासनाचा लाखोचा महसूल बुडवित आहे. यात महसूल अधिकारी यांना लाभ देवून त्यांना मॅनेज केले जात असल्याचे प्रकार याठिकाणी घडत आहे. सदर काही स्ट्रोन क्रशरची पाहणी केली असता या स्ट्रोन क्रशर वाल्यांनी शासकीय नियमाची ऐसी -तैसी करून जमीनीत बोर ब्लास्टींग ने मोठे भगदड पाडले आहे. परिसरात अवैध उत्खनन झाल्याचे घटनास्थळी पाहणी केले असता आढळून आले.
सदर स्ट्रोन क्रशरच्या मालकांनी अवैध गोरख धंद्यांची मांगरूड येथील स्वप्नील मालके यांनी पुढाकर घेवून पोलखोल केल्याने बरेच गैरप्रकार उघडकीस आणल्याने शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. आता शासन या स्ट्रोन क्रशर मालकावर कोणती कारवाई करते याकडे नागरीकांचे लक्ष वेधले आहे.
मांगरूड फाटा हे दोन्ही महत्वाच्या मार्गाला जोडणारे ठिकाण आहे. या मार्गावर काहीनी आपल्या पोटा पाण्या च्या उदरनिर्वाह करीता चहा नाश्ता व जेवनाची दुकाने थाटली. परंतु परिसरतील असलेल्या महा मार्गलगत स्ट्रोन क्रशर मधून वेळोवेळी ब्लास्टींग व २४ तास मुरूम,गिट्टी, दगड याची एक सारखी वाहतूक सुरू असल्यामुळे सर्वत्र घूळ उडतो. त्यामुळे हा व्यवसाय ही अडचणीत सापडला आहे.
येथे व्यवसाय करणाऱ्या व परिसरात राहणाऱ्या नागरीकांना चांगलाच त्रासदायक ठरत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून लोकांना श्वास घेणे कठीण होत आहे. परिसरात आदिवासी आश्रम आहे. यात जवळपास दोनशे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असून त्याचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. परंतु स्ट्रोन क्रशर मालकाच्या दादागिरी व धमकीमुळे विरुद्ध कुणीही तक्रार करण्याची हिंमत करीत नाही.




