टॉप स्टोरी महाराष्ट्र

35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी प्रकल्प

दावोसमधून देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्व सार्हता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे गेट वे ऑफ इंडिया आहे. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल, 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनाॅमिक फोरमच्या वार्षिक बैठकित व्यक्त केला.

राज्यात सध्या तिसरी मुंबई उभी राहत असून या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुमारे 10 ते 12 वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जात आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे प्रकल्प उभारले जात आहेत.

गेल्या दशकात महाराष्ट्राने सातत्याने 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला आहे. याच गतीने काम करत राहिल्यास 2032 ऐवजी 2030 पर्यंतच महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठू शकेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. दावोसमध्ये आतापर्यंत एस.बी.जी. ग्रुप, सुरजागड इस्पात लि., सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट, के.रहेजा कार्पोरेशन, अल्टा कॅपिटल, आय आय.आय.ए.एम.ग्लोबल, बी.एफ.एन.फोर्जिंग्ज, सोकी ग्रीन एनर्जी लिमिटेड या दीदीचा क्षेत्रातील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *