मुंबई, दि.१९। प्रतिनिधी आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने एक अनोखी गोष्ट घडली आहे. इस्त्राईल या देशात एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे. तसेच, शिवराजस अष्टकचे निर्माते व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनाही खास निमंत्रण देवून, त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. दिग्पाल लांजेकर यांचू या संदर्भातली पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. लांजेकर म्हणातत की, ईस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईल मधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे.