नवी मुंबई

नवी मुंबईत भाजपची सत्ता येणार: वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन

नेरूळमध्ये भाजपाची प्रचारात मुसंडी

नवी मुंबई:शहरातील लोकांनी गेले पंचवीस वर्षे गणेश नाईकांवर प्रेम केलं आहे त्यामुळे महापालिकेत यावेळी भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरवणे, नेरूळ विभागात पॅनल २१ नेरूळमधील भाजपचे उमेदवार माधुरी जयेंद्र सुतार, जयवंत दत्तात्रेय सुतार, मीरा पाटील, सुरेश शेट्टी यांच्या प्रचारासाठी नेरूळ येथे घेतलेल्या निर्धार विजयाच्या प्रचार सभेत गणेश नाईक बोलत होते. दरम्यान नेरूळ मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावेळी उमेदवार प्रभाग क्रमांक २१ अ. माधुरी जयेंद्र सुतार २१ ब. मीरा पाटील, २१ क. जयवंत दत्तात्रेय सुतार, २१ ड. सुरेश शेट्टी यांच्या कार्य अहवाल प्रकाशन करण्यात आला.

देशातील महापालिकेच्या वेबसाईटला जा गुगल किंवा युट्युब ला जा २५ वर्षात एखाद्या शहरातील लोकांनी एखाद्या नेत्यावर प्रेम करावं जो शेतकरी कुटुंबातील असो किंवा खेडेगावातील असो अशा लोकांनी एकमेव गणेश नाईक यांच्यावर प्रेम केला आहे. त्याचं कारण असं आहे. आमची नाळ जनतेशी जुळलेली आहे.

सर्व धर्माच्या लोकांना समानता व न्याय देण्याचं काम आम्ही केला आहे. आम्ही कधीच भेदभाव केला नाही, प्रत्येकाला प्रत्येक माणसाला आम्ही प्रेम दिलेला आहे. त्यामुळे यावेळी भाजपची नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगून सन २००२ साली मी जनतेला आश्वासित केले होते की येणाऱ्या वीस वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणताही टॅक्स वाढणार नाही व मी कोणत्याही टॅक्स वाढवून दिला नाही यापुढे आणखी वीस वर्ष वाढवून देणार नाही.

रिडेव्हलपमेंट नावाखाली खैरात वाटप सुरू आहे, अशा दलाल लोकांपासून आपण सावधान राहावा असा इशारा गणेश नाईक यांनी दिला. मोरबे धरणाच्या विकत असताना पंचवीस वर्षाचे ध्येय धोरण ठरविले होते मात्र नवी मुंबईतील वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून कर्जत जवळील पोशिर धरण घेण्याचे सुद्धा आश्वासित केले. तसेच परिवहन सेवा सुरु करण्याचा शब्द दिला होता आजही परिवहन सेवा सुरू आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सेवा देत असताना महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होत नाही.

कोविडच्या काळात सुद्धा आमच्या सहकार्यासह कोविड सेंटरला भेट दिली आहे तसेच सर्वतोपरी मदत केली आहे म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेवर १६ तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा मला ठाम विश्वास आहे नवी मुंबईच्या समस्यांची जाण असणारे व त्या सोडवणारे फक्त हेच उमेदवार असून यांनाच आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन गणेश नाईक यांनी केले.

प्रभागात वॉटर, मीटर, गटर यासारख्या मूलभूत विषय आहेत इतर दैनंदिन भौतिक सुविधांना प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने त्या समस्यांचे निवारण करण्यात आले आहे. गेले 50 वर्षापासून सुतार परिवार प्रभावीपणे समाज उपयोगी कार्य करीत आहे. त्यामुळे आम्ही कधीच भेदभाव केला नाही. आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातो.

अपप्रचार करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटत आहे. अशा भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये प्रभागाच्या विकास व नागरिकांचा विकास हेच आमचा उद्देश असल्याचे प्रभाग क्रमांक २१ अ चे उमेदवार माधुरी जयेंद्र सुतार यांनी सांगून कोविड काळात सुद्धा दोन महिने अन्न पुरवण्यात आले तसेच माक्स, अल्बमच्या गोळ्या, जंतुनाशक फवारणी रुग्णालयात बेड व ऑक्सिजनची तरतूद केली .

रुग्णांना रुग्णवाहिका, अन्नधान्य भाजीपाला पुरवण्याचे काम नामदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून महापौर जयवंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली जयेंद्र सुतार यांच्या सहकार्याने सेवाभावी वृत्तीने केल्याचे माधुरी सुतार यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात नगरसेवक असताना पाणीपुरवठा सभापती ते महापौर म्हणून जे उल्लेखनीय कामगिरी केली आहे ती कामगिरी दिघा ते बेलापूर पर्यंतच्या नगरवासीयांना माहिती आहेच माझी काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती व काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव बघता पुन्हा सेवक म्हणून प्रभागात रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरणपूर्वक सुविधा व सुरक्षित नेरुळ घडवण्यासाठी आपण काटेकोरपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रभाग क्रमांक २१ क चे उमेदवार जयवंत सुतार यांनी सांगितले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *