वर्धा

आर्वीतील आनंदी गुणवंत गुल्हाणे हि पारंपरिक नुत्यामध्ये महाराष्ट्र लेव्हला प्रथम

आर्वी, प्रतिनिधी:छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या युथ फेस्टिव्हल युनिव्हर्सिटी अंतर्गत होणारे गेम तसेच पारंपरिक नृत्यामध्ये महाराष्ट्र लेव्हलला तिने यश मिळवल्याने आता तिचे नॅशनल लेव्हल मध्ये झालेल्या गुणवत्ता यादीत तिचे नामाकंण दाखल झाले.

आर्वी येथील कु.आनंदी गुणवंतजी गुल्हाणे हिने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येवून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहेत. अर्थातच ही स्टेट लेव्हल स्पर्धा, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली तर नॅशनल लेव्हल ही स्पर्धा तामिळनाडू राज्याची राजधानी. चेन्नई येथे मार्चमध्ये होणार आहेत. त्या मध्ये तिचे नामांकन दाखल झाले आहेत. या बद्दल समाजाच्या सर्वच स्तरावरून तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तिच्या या यशात तिचे मार्गदर्शक शिक्षक आणि आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहेत. तिच्या नेत्रदीपक यशाबद्दल पंकज गोडबोले, अविनाश टाके, सुनील टाके, विनोद चौकडे, अनिल लांडगे, गुणवंत गुल्हाने, अनुप खुणे यांनी चेन्नई येथे मार्चमध्ये होणाऱ्या स्पर्धेत ती यशाचा झेंडा निश्चितच रोवल्याशिवाय राहणार नाहीत अशा भाविवाटचालिसाठी मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *