बोटाला लावण्यात येणारु शाई ही नेलपेंट रिमूव्हरने निघत असल्याचा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोस्ट केल्यानंतर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात आहे. दुबार व बोगस मतदानाला प्रोत्साहन देण्याचा हा निवडणूक आयोगाचा घाट आहे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पैसे वाटप करून मतदारांना आमिष दाखविणे, त्यातून उद्भवणारी हाणामारी, आचारसंहितेला काळीमा फासणाऱ्या घटना होत असताना बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. ही शाई नेलपेंट रिमुव्हरने निघत असल्याचा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोस्ट केला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रचंड प्रमाणात गैरव्यवस्थापन होत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.
शाळेची अगोदर टेस्टिंग केली नाही का?, अगोदरच काळजी घ्यायला हवी अशा प्रश्नांच्या भडीमारीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुसल्या जाणाऱ्या शाईवर आक्षेप घेतला आहे.
हा दुबार मतदानाचा घाट आहे असे मत मांडत निवडणूक आयोगाचे सत्ताधाऱ्यांशी एकसंघता आहे. पैशाचे वाटप यावर होणारे दुर्लक्ष्य, प्रचार थांबल्यानंतरही गृहभेटीस उमेदवारांना मुभा देणे ह्या लोकशाहीला मारक गोष्टी आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली.




