नगराध्यक्षांसह, नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ, व सत्कार सोहळा
मौदा प्रतिनिधी:मौदा शहरातील जनतेने एकजुटीने भाजपावर जो विश्वास टाकून नगराध्यक्ष निवडून आणला मौदा शहरातील संपूर्ण जनतेचा तो विश्वास कायम राखण्यासाठी मौदा नगर पंचायत मार्फत होणाऱ्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले, मौदा नगर पंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत, माजी आमदार टेकचंद सावरकर, डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, निशा सावरकर, संकेत बावनकुळे, बाबा गुजर, मुकेश अग्रवाल, कैलास बरबटे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
पारदर्शक व जनहितकारी प्रशासन राबविण्याचा निर्धार…!!! ॲड, आशिष जयस्वाल
राज्य मंत्री ॲड आशिष जयश्वाल यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित पारदर्शक व जनहितकारी प्रशासन राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. मौदा शहरातील नागरी सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा तसेच शहर सौंदर्याकरण या कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील जे काही कामे राहिले असतील त्यांच्यासाठी शासन स्तरावरून निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकू असे आश्वासन त्यांनी दिले.
मौदा शहराच्या विकासासाठी भरीव निधी देणार – बावनकुळे
नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रसन्ना राजाभाऊ तिडके यांच्या पुढील काळात विविध विकास कामे करताना मी मंत्री या नात्याने अजिबात मागे राहणार नाही, शक्य तेवढा विकास निधी मौदाशहराला देवून या शहराला विकास कामाच्या माध्यमातून प्रसन्ना राजाभाऊ तिडके हे नेहमीच अग्रेसर राहतील, मौदा शहर सुखी आणि सुजलाम् सुफलाम् करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आली, ती समर्थपणे ते पार पाळतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.




