नवी दिल्ली, दि.२। वृत्तसंस्था देशातील सुमारे ४ हजार आमदारांकडे एकूण ५४,५४५ कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या २०२३-२४ च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३.६३ कोटी रुपये आहे. एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४०३३ पैकी ४००१ आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे.