इंफाळ, दि.१०। वृत्तसंस्था मणिपूरच्या ४० आमदारांनी बुधवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी आपल्या ६ मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये मणिपूरमध्ये एनआरसीची अंमलबजावणी, उग्रवाद्यांकडून शस्त्रे मागे घेणे आणि शांतता चर्चे साठी पुढाकार यांचा समावेश आहे. त्याचवेळी, विशेष विधानसभा अधिवेशनाची मागणी करत बुधवारी रात्री ९.३० वाजता शेकडो महिलांनी इम्फाळमधील कीसमपट, कीसमथोंग आणि क्वाकीथेल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील वांगखेई आणि कोंगबा येथे मशाल मिरवणुका काढल्या. दुसरीकडे स्थानिक पोलीस आणि आसाम रायफल्स आमनेसामने आले आहेत. दोघांमधील संघर्ष वाढला आहे. दोघांमधील वादाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.