नागपूर जिल्हा भिवापुर

रोगनिदान व आरोग्य शिबीर संपन्न

भिवापूर (प्रतिनिधी ):अपेक्स मजदूर संघ, उमरेड व राज्य कामगार विमा सोसायटी, कामगार रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अपेक्स बिल्डसीस लिमिटेड या कंपनीतील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आज यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन अपेक्स मजदूर संघाचे उपाध्यक्ष रोहीत सुधीर पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार रुग्णालयाचे डॉ. कांबळे व त्यांची वैद्यकीय टीम, अपेक्स मजदूर संघाचे पदाधिकारी प्रभाकर बुचे, बबन देशमुख, राहुल भिल, अशोक चौधरी, संदीप चौधरी, युवराज खंडाळ, .दीपक बिसेन आणि अपेक्स बिल्डसीस लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिराचा शेकडो कामगारांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, आरोग्य सल्ला व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपाध्यक्ष रोहीत पारवे यांनी जाहीर केले की, कामगारांचे आरोग्य व कल्याण लक्षात घेता अपेक्स मजदूर संघाच्या वतीने उमरेड एमआयडीसी परिसरात अशा प्रकारची आरोग्य शिबिरे सातत्याने राबविण्यात येतील.कामगारांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *