अकोट अकोला जिल्हा

नरनाळा महोत्सव पोपटखेड अथवा शहानूर येथे साजरा करावा- डॉ.श्याम देशमुख (अध्यक्ष:वंदे मातरम फाऊंडेशन, पोपटखेड)

अनुप धोत्रे (खासदार) यांचाकडे मागणी

अकोट: अकोट तालुक्यात “नरनाळा महोत्सव” आयोजित केला आहे हा महोत्सव अकोट तालुक्याचे भुषण वाढवणारेच आहे , परंतु महोत्सवाचे महत्व आणि ऊद्देश हा खरा सफल करावयाचा असेल तर तो संपूर्ण महोत्सव हा शहानुर, पोपटखेड या भागात जर साजरा केला तर त्या भागातील आदिवासी लोकांना रोजगार ऊपलब्ध होईल व आदिवासी लोक संस्कृती जोपासना, वनसंवर्धन, गड किल्ले दर्शन तथा डोंगराळ दुर्गम भागातील जनजिवन जवळून बघता अनुभवता येते.

महोत्सव खरा सार्थक तेव्हाच होईल जर आपण येणाऱ्या पर्यटकांना किल्ले दर्शन व जंगल भ्रमंती व ग्रामीण लोकांना रोजगार ऊपलब्ध करुन देणे हा ऊद्देश डोळ्यासमोर ठेवून महोत्सवाचे आयोजन हे त्याच परिसरात करावे कारण अकोट पासुन शहानुर हे अंतर 22 कि. मी. आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करवा या आयोजनाचे स्थळ हे शहानुर, पोपटखेड परीसरातच करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी साहेब यांचेशी चर्चा करुन देण्यात यावे.

अशी मागणी मिटींग ला उपस्थित असलेल्या मा.आ.संजय गावंडे,माजी न.प. अध्यक्ष पुरोषत्तम चौखंडे,राजूभाऊ नागमते,एड. मनोज खंडारे,दिलीप बोचे, डॉ.ईंगोले,प्रभुदास तळोकार, विक्रम ठाकूर, गोपाल मोहोड, शिवराज कोरपे, पोपटखेड सरपंच विजेंद्र तायडे, यांनी केली या मिटींग चे आयोजक श्याम देशमुख हे होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *