माणूसपणाची पाऊलवाट

नात्यातून सामाजिक जाणीव जपणाऱ्या शिल्पा शेटे

आजचा काळ वेगाचा आहे, अविरत धावणारा, थांबायला नकार देणारा आहे. माणूस इतका गुंतला आहे की आजूबाजूला पाहण्याची सवडही त्याला उरत नाही. स्वतःपुरता विचार, स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचं सुरक्षित वर्तुळ याच्या पलीकडे जाणं जणू अशक्य झालं आहे. अशा काळात कुणी थांबतं, कुणाचं दुःख ऐकतं, कुणासाठी हात पुढे करतं, तेव्हा ती व्यक्ती केवळ एक व्यक्ती राहत नाही; ती आधार बनते, आशा बनते, आणि हळूहळू प्रेरणा बनते.अशीच एक प्रेरणादायी आणि सेवाभावी काम करणारी व्यक्ती म्हणजे शिल्पा शेटे.

शिल्पा यांचे सासर बीड जिल्ह्यातले दिंद्रुड हे गाव. माहेर सोलापूर जिल्ह्यातले वैराग. शिल्पा शेटे यांचा प्रवास हा यशाचा आराखडा मांडणारा नाही, किंवा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करणारा नाही, तो आहे, माणसाशी माणूस म्हणून जोडणारा, वेदना समजून घेणारा आणि त्या वेदनांवर मायेची फुंकर घालणारा प्रवास आहे. आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी, या तीन मूल्यांच्या धाग्यांनी त्यांनी आपल्या कामाचं वस्त्र विणलं आहे. उद्योगाची कास धरणाऱ्या शिल्पा यांनी मराठवाडा आणि महाराष्ट्रात अनेकांच्या हाताला काम दिले, अनेकांना रोजगाराचे धडे दिले. ‘भाऊ’ नावाचे प्रेमळ नेटवर्क जे अत्यंत निस्वार्थीपणे काम करते, ते नेटवर्क त्यांनी राज्यभर उभे केले. त्या नेटवर्क च्या माध्यमातून

आरोग्य ही संकल्पना शिल्पा यांच्या दृष्टीने केवळ औषधापुरती मर्यादित नाही. शिल्पा शेटे यांच्यासाठी आरोग्य म्हणजे रुग्णाच्या शरीराइतकंच त्याच्या मनाची काळजी घेणं. आजारासोबत येणारी भीती, असुरक्षितता, एकटेपणा, हे सगळं त्या ओळखतात. आज जेव्हा रुग्णसेवा म्हणजे एक कोरडी यंत्रणा बनत चालली आहे, तेव्हा त्या त्या यंत्रणेत मानवी स्पर्श जिवंत ठेवतात. बोलण्यातला मृदूपणा, ऐकून घेण्याची तयारी आणि “तुम्ही एकटे नाही” ही भावना, यातूनच त्यांची सेवा आकार घेते. अनेकांना त्यांनी त्यांच्या मदतीने

गरीब, वंचित, दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. गाव, तालुका, जिल्हा, शहर, असा कुठलाही भेद न ठेवता त्या माणसांपर्यंत पोहोचतात. कुणाच्या व्यथा ऐकतात, कुणाच्या प्रश्नांना संयमानं उत्तर देतात, तर कुणाला योग्य ठिकाणी जोडून देतात. कुठेही गाजावाजा नाही, कुठेही श्रेयाची अपेक्षा नाही, फक्त प्रामाणिक सेवा आणि माणुसकीची नाळ.

या सेवेतूनच शिल्पा शेटे यांनी राज्यभर नात्यांचं एक अदृश्य पण मजबूत जाळं विणलं आहे. आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते, सामाजिक संस्था, प्रशासनातील अधिकारी, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिक, हे सगळे त्या जाळ्याचे घटक आहेत. कुणाला मदतीची गरज असली, कुणी अडचणीत असलं, तर त्या जाळ्यातून योग्य माणूस, योग्य संस्था, योग्य दिशा मिळते. हा जाळा केवळ व्यवस्थेचा नाही, तर विश्वासाचा आहे.

अनेक वेळा प्रशासन, संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात दुरावा निर्माण होतो. त्या दरीतून संवादाचा पूल उभारण्याचं काम शिल्पा शेटे सातत्याने करतात. त्यांच्या संवादात अधिकार नसतो, आग्रह असतो; आदेश नसतो, समजूत असते. त्यामुळेच “कोणी तरी आपल्यासाठी आहे” ही भावना अनेकांच्या मनात रुजते. आणि ही भावना निर्माण करणं, आजच्या काळातली सर्वात मोठी समाजसेवा आहे.

त्यांच्या कार्याकडे पाहताना ‘स्त्री’ हा शब्द मुद्दाम पुढे येत नाही. कारण त्या केवळ स्त्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, जबाबदार आणि सजग माणूस म्हणून समाजासमोर उभ्या राहतात. अडचणी कितीही असोत, परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, हार न मानता उभं राहणं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.

शिल्पाताई हे म्हणजे केवळ पुराणातील एक कथा सारखे पात्र नाही, तर जिवंतपणी माणुसकी जपणारी, दुसऱ्यासाठी लढणारी आणि समाजाला धरून ठेवणारी शक्ती. आजच्या काळात शिल्पा शेटे यांच्यासारख्या व्यक्ती म्हणजेच आधुनिक मानवतावादी लढणाऱ्या जिजाऊ आहेत. ज्या समाजात आशा पेरतात, विश्वास जागवतात आणि माणसाला पुन्हा माणूस म्हणून जगायला शिकवतात.

अशा जिजाऊंचा आदर व्हायलाच हवा, त्यांच्या कामाचे पारायण होऊन ते काम दूरवर गेले पाहिजे.
अशाच महिलांमुळे आपला समाज जिवंत राहत चांगुलपणा साठी पुढाकार घेतला जातो. अशाच महिलांमुळे माणुसकीवरचा विश्वास टिकून राहतो.

मंगल फलफले ह्या शिल्पा ताई यांच्या आई म्हणाल्या, “माझी शिल्पा म्हणजे फक्त माझी मुलगी नाही, ती माझा श्वास आहे.
तिच्या जन्मापासून आजपर्यंतचा प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यांसमोर आहे. किती अडचणी आल्या, किती वेळा डोळ्यात पाणी आलं, पण तिने कधी हार मानली नाही.

आज लोक तिचं काम पाहून कौतुक करतात, तेव्हा आई म्हणून माझं काळीज भरून येतं. ‘हीच ती माझी लेक’ असं अभिमानाने सांगताना डोळे पाणावतात.

देवाने मला जेवढं दिलं, त्यातला सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे माझी शिल्पा. ती जिथे जाईल, तिथे माणुसकी, सचोटी आणि प्रेम घेऊन जाईल, याची मला खात्री आहे.”

शिल्पा म्हणतात, “माझ्यासाठी समाजकार्य म्हणजे मोठ्या घोषणा देणं नाही, तर समोरच्या माणसाचं दुःख शांतपणे ऐकून घेणं आहे. कुणी अडचणीत असेल तर त्याला योग्य माणसापर्यंत, योग्य ठिकाणी जोडून देणं, इतकंच मला जमलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे.

आरोग्य असो, शिक्षण असो किंवा सामाजिक प्रश्न, रोजगाराचा विषय असो प्रत्येक ठिकाणी माणुसकीचा धागा तुटू नये, यासाठी मी प्रयत्न करते. आज मदत करणारी माणसं नाहीत असं नाही, पण त्या मदतीला विश्वासाची जोड लागते.माणूस माणसाशी जोडला गेला, तरच समाज मजबूत होतो. मी काही वेगळं करत नाही, फक्त नात्यांची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करते. हीच माझी भूमिका आहे आणि हीच माझी जबाबदारी.

”शिल्पा शेटे यांचं कार्य हे केवळ आजपुरतं मर्यादित नाही; ते उद्याच्या समाजाचं बीज आहे, हे त्यांच्या कार्यावरून पुढे येते.
शिल्पा यांच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा…
नात्यांच्या, विश्वासाच्या आणि माणुसकीच्या या जाळ्याचा हा मानवतेचा जागर शिल्पा यांच्या रूपाने सतत होत राहो, हीच अपेक्षा

शिल्पा शेटे संपर्क क्रमांक
9890706300

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *