उल्हासनगर , दि . १७ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप १ येथे असलेल्या महान लक्झुरिया या १४ मजली निवासी प्रकल्प हा यू नंबर ३९८ , शीट नंबर ७२ , सी.टी.एस. नंबर ६६८४ मध्ये आहे. हा प्रकल्प अनिल गुलाब जामुन रोडवर सोनारा हॉलजवळ असुन यामध्ये १ , २ आणि ३ बीएचके असे ५३ फ्लॅट आहेत, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ १९६५ .७२ चौरस मीटर आहे.मात्र हे बांधकाम नाल्यावर असुन यामुळे स्थानिक नागरिकाना त्रास होणार आहे. तेव्हा बांधकाम व्यवसायीकाने नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे या बांधकामावर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर कॅंप १ येथील अनिल गुलाब जामुन रोडवर सोनारा हॉल जवळ १ ,२ ,३ ,बी एच के चा मोठा प्रोजेक्ट सुरु असुन या इमारतीच्या जवळूनच एक नैसर्गिक नाला वाहत आहे .दरम्यान या बांधकाम व्यवसायीकाने त्या नाल्यावर जवळपास ३०० फूट लांबी व १२ फूट रुंदीचे आरसीसी सिमेंट काँक्रिटीकरण करून कव्हर केले आहे. भविष्यात कोणताही प्राणी किंवा माणूस अड़कला तर त्या ठिकाणावरुन काढणे मुश्किल होणार आहे .तसेच पावसाळ्यात आसपासच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या नाल्याला खाजगी प्रोजेक्टमध्ये वापरले असुन फायर मार्जिनसुद्धा लक्षात ठेवले नाही. नाल्यावर जवळपास ४५ टन सिमेंटचा लोड झाला निर्माण झाला आहे. दरम्यान बाजूलाच इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर असुन या बांधकामाजवळ डीपीमध्ये हा रोड १२ मीटर आणि जागेवर ६ मीटर आहे.
एनजीटीनुसार नाल्याची मार्जिन न्यूनतम ६ मीटर कोणतीही भींत, बाउंड्री, कोणतेही निर्माण परवानगी नाही, त्यानंतर ६ मीटर फायर मार्जिन आणि बिल्डिंग तयार झाली आहे .तर २ मीटर नाल्यावरून वर कव्हर करून, जर यूडीसीपार, फायर, एनजीटी, एमपीसीबी, सिटी इंजीनियरिंग मार्जिन डिझाइन केले, तर न्यूनतम बिल्डिंगला २० फूट जवळपास कट करावे लागू शकते. त्यामुळे फायर मार्जिन ६ मीटर ओपन टू स्काई आवश्यक आहे. दरम्यान ही ग्रीन झोनमधून आर झोनमध्ये केलेली मालमत्ता असुन झोनिंग चेंज करताना नाला लपवला गेला असल्याचा संशय बळावला आहे . तेव्हा या इमारतीमध्ये सदनिका खरेदी करणाऱ्या उपभोक्त्यांना धनहानीचा सामना करावा लागु नये म्हणुन महापालिकेने या इमारतीवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी
शशिकांत दायमा यांनी केली आहे .



