नवी मुंबई:नवी मुंबई महानगर पालिकेवर तब्ब्ल सहा वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपा च्या एक हाती सत्ता आल्या वर स्थायी समिती ही महापालिकेची ‘तिजोरीची किल्ली’ मानली जाते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या १६ सदस्यांमधून स्थायी समिती सभापती पदी कोणाची वर्णी लागते, याकडे लागले आहे.
शिवसेनेने आपल्या कोट्यातून अनुभवी आणि निष्ठावान नगरसेवकांना संधी दिली आहे त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अनिता पाटील, दीपाली सकपाळ,आकाश मढवी,सुरेश कुलकर्णी,सरोज पाटील,मंदाकिनी म्हात्रे यांची तर भाजपा मधून माजी महापौर जयवंत सुतार ,सुधाकर सोनवणे, शशिकांत भोईर,प्रदीप गवस,अशोक पाटील,सुरेश शेट्टी, माजी महापौर सागर नाईक,संदीप म्हात्रे,स्वाती गुरखे,अंजली वाळुंज यांना संधी देण्यात आली आहे. तब्बल सहा वर्षानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपने एक हाती सत्ता घेतली आहे त्यामुळे भाजपाचे संख्याबळ बघता महापालिके तिजोरीची चावी कोणाकडे जाणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे




