नागपूर, दि. ९ – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आकस्मिक सोमवारी पेठ परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली.
आपल्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयात मिळणारे उपचार, जेवणाचा दर्जा आदी माहिती जाणून घेतली. रुग्णालय परिसराचीही त्यांनी पाहणी केली. रुग्णालयात ठेवली जाणारी स्वच्छता याचीही कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली . यावेळी त्यांनी डॉक्टरांशीही संवाद साधला. रुग्णांना दिले जाणारे उपचार, औषधांची उपलब्धता याची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.




