१० वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे २५ वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात,
सर्वोदय विद्यालयाचा पुढाकार,
मौदा प्रतिनिधी:तालुक्यातील धानला येथील सर्वोदय विद्यालयात २५ वर्षांपूर्वी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी जुन्या वर्गमित्रांची मैफीलच जमल्यामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
विद्यार्थ्यांचे हे २५ वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता. या कार्यक्रमाला साधारण ४० ते ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनी लगबगीने शाळेत हजर होत या सोहळ्याचा आनंद घेतला. आमच्याकडे फोन मोबाईल ईमेल फेसबुक अशी कम्युनिकेशनची साधने उपलब्ध असल्याने मित्र, मैत्रिणी शोधायला काहीच वेळ लागला नाही. शोधाशोध हे कठीण काम असतानाही आम्ही एकमेकांच्या सहाय्याने सर्वांचा शोध घेऊन पार पडलेल्या स्नेह संमेलनात आठवणी जागवल्या.
या स्नेह मेळाव्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची नोंद, आपल्या शेजारी बसलेल्यांची ओळख करून देणे, पंचवीस वर्षात आलेले सामाजिक आणि नोकरीमध्ये आलेले चांगले अनुभव याची देवाणघेवाण, संगीत खुर्ची रिंग टाकणे, हौझी गाणी दरवाजा पुढील रांगोळी असे कार्यक्रम खेळ यावेळी उत्साहात पार पडले. अपरिहार्य कारणामुळे काही मित्र मैत्रिणी या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची अनुपस्थिती हजर असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींना खूपच जाणवली. या वर्षी भेटवस्तू म्हणून शाळेचे नाव, बॅच चे सन व २५ – सुवर्ण वर्षाचा लोगो असलेली सौर समई भेट देण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून आजी माजी शिक्षक वृंद उपस्थित होते. मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा सुद्धा जुन्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आला, सर्व विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने मेळावा पार पडला. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामुळे वातावरण भावूक झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता किरपान यांनी केले तर आभार अनिल पत्रे यांनी मानले,
२५ वर्षांनंतर विद्यार्थी आले एकत्र !
शिक्षक व विद्यार्थी यांच्या आठवणीमधून सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. २५ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत शिकण्याचा अनुभव घेतला. वर्ग घेतल्यानंतर अनेक शिक्षक व माजी विद्यार्थी भाऊक झाले होते. तसेच दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
यात राधेश्याम मथुरे, संदीप मते, संदीप किरपान, अनिल पत्रे , छगन चरडे , योगेश गडे , राहुल वाडीभस्मे , गौतम वैद्य, दादाराव वैद्य, शैलेश वैद्य , विलास ठोंबरे , सविता सावरकर , नीता पत्रे, वर्षा आगरकर , कविता ठोंबरे , सुषमा आकरे, मनोज भगत , विनोद गडे पुस्तकला आपतुरकर वंदना राजगिरे प्रवीण बारहाते, वैशाली लांजेवार, प्रीती थीगडे , आदी उपस्थित होत




