नागपूर मौदा

मौदा शहरातील अंतर्गत रस्त्यावरील अवैध पार्किंग

वाहन चालकांसाठी डोकेदुखी,मौदा तालुका प्रतिनिधी

मौदा शहरात मागील काही वर्षात बहुतेक सर्व वस्त्यात अंतर्गत सिमेंट रस्ते तयार झालेले आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भूखंडावर अनेक घरे बनलेली आहे परंतु या मार्गावरून जात असताना अनेक वाहन चालक आपले खाजगी वाहन घराच्या समोर रस्त्याच्या कडेला उभे ठेवतात इतकेच नव्हे तर या नागरिकांची घरे मार्गाच्या वळणावर आहे अशा घरमालकांनी आपल्या भिंतीला इजा पोहोचू नये म्हणून कोपऱ्याला दगड ठेवलेले दिसतात त्यामुळे एखाद्या मार्गावर वाहन काटकोनात वळण घेत असताना हे दगड गाडीला लागतात त्यामुळे गाडीचे नुकसान होते अनेकांनी तर रस्त्यावर नवीन घरगुती बांधकामाची रेती विटा व इतर साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या त्यामुळे हे रस्ते मोठे असूनही अरुंद झालेले आहे

विशेष म्हणजे नागरिक लाखो रुपये खर्च करून घरे बांधतात परंतु आपल्या वाहनासाठी कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था करत नाही त्यामुळे मौदा शहराच्या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची पार्किंग होताना दिसते वास्तविक पाहता प्रत्येक लेआउट मध्ये ओपन स्पेस ची जागा उपलब्ध आहे परंतु नगरपंचायत प्रशासन हे ओपन पीस साफ करत नसल्याने त्या ठिकाणी मोठमोठे झाडे झुडपे वाढलेले आहेत पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पाण्याचा संचयन होते यापैकी अनेक भूखंड असे आहे की त्या भूखंड मालकांची अचूक नोंद नगरपंचायत प्रशासनाच्या दरबारी नसल्याने नगरपंचायत प्रशासन हत बल झाल्यासारखे वाटते वास्तविक या मालकांची ते भूखंड आहे त्या मालकांनी आपले भूखंड दरवर्षी स्वच्छ करायला पाहिजे जेणेकरून परिसरात झाडे झोपी वाढणार नाही पाण्याचं संचयन होणार नाही त्यामुळे डास मच्छर सरपटणारे प्राणी यांचा त्रास भूखंडाच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी नागरिकांना होणार नाही

ही बाब लक्षात घेऊ नगरपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे हे भूखंड स्वच्छ झाले तर मौदा शहरातील विविध वस्त्यांमधील मुलांना खेळण्याचे मैदान उपलब्ध होऊ शकते कारण वस्तीत खेळण्याची जागा नसल्यामुळे अनेक लहान मुले मुख्य मार्गावरच क्रिकेट व इतर खेळ खेळताना दिसतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे तसेच अंतर्गत मार्गावर वाहन गतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने वरदळीच्या ठिकाणी गतिरोधक लावणे आवश्यक आहे जेणेकरून वाहनाच्या गतीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात येईल आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने ज्याप्रमाणे नगरपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *