अमेरिका इराक युद्धाचा गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणान
मौदा:-मागील काही वर्षापूर्वी सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचे कनेक्शन दिले त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सिलेंडर महाग असूनही गॅसवर स्वयंपाक करू लागले परंतु सध्या अमेरिका इरान यांच्यामध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा परिणाम आपल्या देशात गॅस सिलेंडर पुरवठ्यावर झालेला आहे आज सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळेनसे झालेले आहे अनेक गॅस सिलेंडर ग्राहक ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु बुकिंग होत नसल्याचे अनेक ग्राहकाचे म्हणणे आहे
याबाबत मौदा येथील गॅस एजन्सी धारकांना विचारणा केली असता बुकिंगची मुदत 21 दिवसाची असल्याचे सांगितले म्हणजेच आज जर बुकिंग केले तर 21 दिवसानंतर सिलेंडर मिळेल त्यामुळे ग्रामीण भागात सध्या तरी गृहिणींना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने त्याचा फटका हॉटेल मालक कॅटर्स वाले यांना बसलेला आहे त्यामुळे आता लग्नकार्यात स्वयंपाक करण्याकरता लाकडांचा उपयोग करून मंगल कार्यालयात मोठ्या चुली वर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे हे जरी झाले असले तरी सामान्य नागरिकांना मात्र आता पुन्हा काही दिवस चुलीवरील स्वादिष्ट अन्नाची चव घ्यायला मिळेल हे मात्र तेवढेच खरे
प्रतिक्रिया
गॅस च्या तुडवडा झाल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी बराच वेळ लागतो व सिलेंडर चा तुडवडा पण आहे
-पेमण पटले गृहिणी




