#Chandrapur

संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर; उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड

चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र…

चंद्रपुरात ‘महाविकास आघाडी’ला सुरुंग; वडेट्टीवारांशी खटके उडाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली?

विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणाने मंगळवारी अनपेक्षित वळण घेतले असून, राज्यातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाने मोठा दे धक्का दिला आहे. त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूरच्या सत्तेसाठी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार…

चंद्रपूरचा सस्पेन्स थ्रिलर : किंगमेकरच्या अटीने काँग्रेस-भाजपची कोंडी; महापौरपदाचा ‘पेच’ आता ‘मातोश्री’च्या दरबारी!

​चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राजकारणात ‘काँटे की टक्कर’ निर्माण केली असून सत्तेचा रिमोट कंट्रोल आता शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती गेला आहे. “अडीच वर्ष महापौरपद आमचेच, नाहीतर सत्तेला विसरा,” अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने…

चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा

धानोरकर–वडेट्टीवार यांच्यात सहमती, सपकाळ यांची मध्यस्थी यशस्वी मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर तोडगा निघाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात शनिवारी सहमती झाली. या समझोत्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष…

काँग्रेसचा ‘मालक कोण?’—चंद्रपूरमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला!

वडेट्टीवार–धानोरकर आमनेसामने; महापालिकेच्या सत्तेभोवती घमासान विशेष प्रतिनिधी | चंद्रपूर:चंद्रपूर महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेपेक्षा सत्तेच्या सूत्रांवरच अधिक रणकंदन सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीच्या आरोपांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता उघड संघर्षात रूपांतरित…

सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार आमने सामने

चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत राहूनच विकास साधला जाऊ शकतो असे वाटत असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या…