नवी मुंबई :आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने “आमदार चषक 2026” भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 13 मार्च 2026 ते रविवार 15 मार्च 2026 रोजी करावे येथील कै. गणपतशेठ तांडेल मैदान, नवी मुंबई येथे रंगणार आहे.
तसेच या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रातील एकूण 24 संघाना प्राधान्य दिले आहे. स्थानिक तरुणांन क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप निर्माण करावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 2,50,001/- व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक 1,25,001/- व आकर्षक व तृतीय पारितोषिक 75,001 व आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टिरक्षक यांना प्रत्येकी आकर्षक चषक व LED टीव्ही देण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट मालिकावीर (Man of the Series) याला मोटारसायकल व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये बक्षिसांची लयलूट पहावयास मिळणार आहे.
त्याच बरोबर पारितोषिक वितरण समारंभ रविवार.15 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05 वाजता करण्यात येणार आहे. त्याच बरोबर स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचे अटी व नियम हे आयोजकांकडे राखीव ठेवण्यात आले आहे.
तसेच आमदार चषक -2016 या भव्य क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करून अधिक माहिती साठी 9820075727 संपर्क साधण्या साठी आवाहन
आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



