बदलापूर

कल्याण-डोंबिवली शहर निरीक्षकपदी अविनाश देशमुख यांची निवड;राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची २०२६ ची जिल्हा निरीक्षक यादी जाहीर

बदलापूर,दि.१२,प्रतिनिधी:महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जिल्हा निरीक्षकांची यादी – २०२६ जाहीर केली आहे. या यादीमध्ये कल्याण-डोंबिवली शहर निरीक्षकपदी अविनाश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत पत्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांनी प्रसिद्ध केले आहे. हे पत्र १२ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले.
दरम्यान, अविनाश देशमुख यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी आधीपासूनच सोपविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता त्यांना अतिरिक्त पदभार म्हणून कल्याण-डोंबिवली शहर निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अविनाश देशमुख यांनी अनेकदा जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन, उपोषण आणि लोकशाही मार्गाने लढे उभारून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अविनाश देशमुख यांनी स्थानिक पातळीवरील शिक्षण, आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, नगरपरिषद प्रशासनातील भ्रष्टाचार, उघडी गटारे तसेच भटके कुत्रे या नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. विविध आंदोलन, उपोषण आणि लोकशाही मार्गाने लढे उभारून त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.
स्थानिक पातळीवरील प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले असून त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये त्यांची ओळख लढाऊ आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा नेता अशी निर्माण झाली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *